जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ: अखेरच्या सामन्यात सूर्यकुमारला विश्वविक्रमाची संधी, रोहितला टाकणार मागे?

IND vs NZ: अखेरच्या सामन्यात सूर्यकुमारला विश्वविक्रमाची संधी, रोहितला टाकणार मागे?

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे या मालिकेत बरोबरीसाठी भारतीय संघ जोरदार प्रयत्न करेल. दुसरीकडे भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला आणखी एक विश्वविक्रम करण्याची संधी आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी ख्राइस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना होणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे या मालिकेत बरोबरीसाठी भारतीय संघ जोरदार प्रयत्न करेल. दुसरीकडे भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला आणखी एक विश्वविक्रम करण्याची संधी आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जर सूर्यकुमार यादवने फलंदाजीत कमाल केली तर आणखी एक विक्रम तो करेल. जर त्याने 5 षटकार लगावले तर रोहित शर्माला मागे टाकून त्याच्या नावावर विक्रमाची नोंद होईल. एका कॅलेंडर वर्षात सर्व प्रकारात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. हिटमॅन रोहित शर्माने 2019 मध्ये 78 षटकार मारले होते. हेही वाचा :  Womens IPL: वुमन्स IPL ची टीम विकत घेण्यासाठी फ्रँचायझीकडे हवेत इतके कोटी! बेस प्राईस बघूनच व्हाल हैराण सूर्यकुमारने यावर्षी आतापर्यंत 74 षटकार मारले आहेत. रोहितचा विक्रम मोडण्यासाठी त्याला फक्त पाच षटकारांची गरज आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर आहे. रोहितने 2019 मध्ये 78, 2018 मध्ये 74, 2017 मध्ये 65 षटकार मारले होते. तर एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये एकूण 63 षटकार मारले होते.

News18लोकमत
News18लोकमत

हेही वाचा :  ‘या’ खेळाडूला करा T20 टीमचा कॅप्टन, गंभीरनं सुचवलेलं नाव वाचून वाटेल आश्चर्य न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात सूर्यकुमार अपयशी ठरला. त्याला फक्त ४ धावाच करता आल्या होत्या. तर पावसामुळे वाया गेलेल्या दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमारने तुफान फटकेबाजी केली होती. सामना रद्द होण्याआधी 12.5 षटकांचा सामना झाला होता. त्यामध्ये भारताने एक बाद 89 धावा केल्या होत्या. सूर्यकुमारने 25 चेंडूत 34 धावांची खेळी केली होती. या खेळीत सूर्यकुमारने 3 षटकार मारले होते. सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये त्याच्या नावावर अनेक विक्रम केले आहेत. यात त्याने टी20 प्रकारात सर्वाधिक धावा करण्याचाही समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात