मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'या' खेळाडूला करा T20 टीमचा कॅप्टन, गंभीरनं सुचवलेलं नाव वाचून वाटेल आश्चर्य

'या' खेळाडूला करा T20 टीमचा कॅप्टन, गंभीरनं सुचवलेलं नाव वाचून वाटेल आश्चर्य

टीम इंडियाच्या टी20 टीमचा भावी कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्याचं नाव आघाडीवर असतानाच गौतम गंभीरनं एक नवं नाव सुचवलं आहे.

टीम इंडियाच्या टी20 टीमचा भावी कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्याचं नाव आघाडीवर असतानाच गौतम गंभीरनं एक नवं नाव सुचवलं आहे.

टीम इंडियाच्या टी20 टीमचा भावी कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्याचं नाव आघाडीवर असतानाच गौतम गंभीरनं एक नवं नाव सुचवलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 29 नोव्हेंबर : भारतीय टी-20 क्रिकेट टीममध्ये येत्या काही दिवसांत मोठे बदल अपेक्षित आहेत. भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. त्याच्याकडून टी-20 टीमचं नेतृत्त्व काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी आणखी एका खेळाडूला टी-20 टीमचा कॅप्टन बनवलं जाऊ शकतं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माकडे टीम इंडियाचं नेतृत्व होतं. पण, मुंबई इंडियन्सप्रमाणे तो भारतीय टीमला वर्ल्ड चॅम्पियन बनवू शकला नाही. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली भारताचं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. असं असलं तरी आता रोहितऐवजी हार्दिक पंड्याकडे भारताच्या टी-20 टीमची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. हार्दिक पंड्या सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

    हार्दिक पंड्यानं गुजरात टायटन्स या टीमला आयपीएलमधील पदार्पणाच्या सिझनमध्येच विजेतेपद मिळवून दिलं आहे. सध्या तो फक्त 29 वर्षांचा आहे. पुढील टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये होणार आहे. तोपर्यंत रोहितचे वय 37 पेक्षा जास्त असेल. हार्दिककडे एका टीमचं नेतृत्व दिलं तर रोहितवरील वर्कलोड मॅनेजमेंटचा भारही कमी होऊ शकतो.

    भारतीय टीमव्यतिरिक्त रोहित आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे. दुसरीकडे, पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं आयर्लंड आणि न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर टी-20 सीरिजमध्ये पराभूत केलं आहे. अशा स्थितीत इतर भारतीय खेळाडूंच्या तुलनेत हार्दिक हा कॅप्टनपदासाठी मजबूत दावेदार आहे.

    सचिनच्या मित्रासह 50 जणांनी भरला फॉर्म, पाहा BCCI कधी करणार नव्या सिलेक्टर्सची घोषणा?

    गंभीरनं सुचवलं नवं नाव

    कोलकाता नाईट रायडर्सला आपल्या नेतृत्वाखाली दोनदा चॅम्पियन बनवणाऱ्या गौतम गंभीरनं पृथ्वी शॉला कॅप्टन बनवण्याची शिफारस केली आहे. पृथ्वी शॉ जुलै 2021 पासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. 2018 मध्ये त्याने भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत तो फक्त पाच टेस्ट, सहा वन-डे आणि एक टी-20 मॅच खेळू शकला आहे. भारताच्या 19 वर्षांखालील टीमचं नेतृत्व करण्यासोबतच त्यानं मुंबई रणजी टीमचंही नेतृत्व केलेलं आहे.

    तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. शॉ हा अतिशय आक्रमक आणि यशस्वी कॅप्टन ठरू शकतो, असा विश्वास गौतम गंभीरला वाटतो.

    भारत 41 वर्षे जुने नकोसं रेकॉर्ड टाळणार का? गावस्करही रोखू शकले नव्हते

    श्रेयस अय्यर-सूर्यकुमार यादवदेखील दावेदार

    भारतीय टी-20 टीममध्ये सध्या सूर्यकुमार यादवचा दबदबा आहे. 2021 मध्ये पदार्पण केल्यापासून त्यानं जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र, तो आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील कोणत्याही टीमचा कॅप्टन नाही. याउलट, श्रेयस अय्यरकडे कॅप्टन्सीचा अनुभव आहे. अय्यर सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन आहे. केकेआरपूर्वी त्याने दिल्ली कॅपिटल्सचंही नेतृत्व केलं आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीची टीम प्लेऑफमध्ये पोहचली होती.

    First published:

    Tags: Cricket news, Gautam gambhir, Hardik pandya, Prithvi Shaw, Team india