मुंबई, 28 नोव्हेंबर: गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेली बीसीसीआयची वुमन्स आयपीएल अखेर पुढच्या वर्षी होणार आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वुमन्स आयपीएलला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर 2023 च्या फेब्रुवारीमध्ये या स्पर्धेचं आयोजन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी बीसीसीआयनं जोरदार तयारी सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वुमन्स आयपीएलच्या पाच टीम्ससाठी लवकरच टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी बेस प्राईस तब्बल 400 कोटी इतकी ठेवण्यात आली आहे. टीमसाठीच्या ई लिलावात सध्याच्या आयपीएल टीमही भाग घेऊ शकतात. हजार करोडपर्यंत जाणार बोली? दरम्यान आयपीएल टीमसाठीची बोली जवळपास एक हजार ते दीड हजार कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या बेस प्राईज 400 कोटी असली तरी अनेक फ्रँचायझी भारतीय क्रिकेटमधल्या या नव्या आवृत्तीसाठी इच्छुक आहेत. सध्याच्या आयपीएल फ्रँचायझीपैकी काही जण वुमन्स आयपीएलसाठीही टीम विकत घेऊ शकतात.
Update on Women's IPL:
— Female Cricket (@imfemalecricket) November 29, 2022
BCCI has asked the existing men’s IPL team owners to participate in the bidding process and is open to any and all investors.
Source: News18 | #CricketTwitter pic.twitter.com/sFeAOgd1Sh
कशी असेल वुमन्स आयपीएल? वुमन्स आयपीएलमध्ये 5 संघांमध्ये 22 सामने खेळवण्याचा बीसीसीआयचा प्लॅन आहे. त्यासाठी 6 परदेशी खेळाडूंसह 18 जणांचा एक संघ बनवण्यात येईल. प्लेईंग इलेव्हनमध्ये जास्तीत जास्त 5 परदेशी खेळाडू खेळवता येतील. या पाच पैकी 4 खेळाडू आयसीसीच्या पूर्ण सदस्य असलेल्या संघातील असतील. तर 1 खेळाडू असोसिएट संघातला सदस्य असेल. एक टीम प्रत्येक टीमसोबत 2 दोन सामने खेळेल. अव्वल स्थानी राहिलेल्या टीमला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरच्या टीममध्ये एलिमिनेटरचा सामना होईल. हेही वाचा - BCCI Selection Committee: सचिनच्या मित्रासह 50 जणांनी भरला फॉर्म, पाहा BCCI कधी करणार नव्या सिलेक्टर्सची घोषणा? कधी होणार स्पर्धा 26 फेब्रुवारीला महिलांच्या टी20 वर्ल्ड कपची फायनल होणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यात वुमन्स आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. दरम्यान पुरुषांच्या आयपीएलआधी स्पर्धा संपवण्याचा प्रयत्न राहील. होम-अवे फॉरमॅट मध्येही ही स्पर्धा खेळवण्याचा विचार सुरु आहे.