दुबई, 26 सप्टेंबर : आज आयपीएलच्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) चा सामना थेट सनरायजर्स हैदराबाद (SRH) शी होणार आहे. हा सामना खास असणार आहे. कारण दोन्ही संघांनी अजूनही विजयी सलामी दिली नाही. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना हा महत्त्वाचा ठरणार आहे.
KKR ने आपला पहिला सामना हा मुंबई इंडियन्ससोबत खेळला होता. पण, 49 धावांनी पराभवाचे तोंड पाहावे लागले. तर दुसरीकडे SRH नेही आरसीबीसोबत झालेल्या सामन्यात 10 धावांनी पराभव स्वीकारला होता.
पहिल्या सामन्यात KKR टीम फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये खास कामगिरी करू शकली नाही. टीमचा स्टार गोलंदाज पॅट कमिंसने 3 ओव्हरमध्ये 49 धावा देऊन सर्वात खराब कामगिरी केली. तर बॅटिंगमध्ये सर्व टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली होती. तर SRH च्या टीमध्ये जॉनी बेअरस्टो शिवाय दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. बेअरस्टोने 43 चेंडूत धानदार 61 धावा केल्या होत्या.
काय आहे दोन्ही टीमची सध्याची परिस्थिती?
दुखापत झाल्यामुळे मिचेल मार्श अजूनही मैदानावर काही उतरला नाही. त्यामुळे त्याच्या जागी जेसन होल्डल दुबईत पोहोचला आहे. तर SRH टीम ही मोहम्मद नबीला संधी देण्याची शक्यता आहे. तर केन विलियमसन अजूनही पूर्णपणे दुखापतीतून बरा झाला नाही. कोलकाताचे सर्व खेळाडू हे फीट आहे. त्यामुळे कर्णधार दिनेश कार्तिक फार काही बदल करणार नाही, असं दिसतंय.
काय सांगता आकडे?
KKR विरोधात दोन सामन्यात वॉर्नरने152 धावा केल्या होत्या.यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तर सनराइजर्समध्ये आंद्रे रसेलचा रेकॉर्ड फार वाईट राहिला आहे. तर दुसरीकडे गोलंदाजाबद्दल पाहिलं तर 2018 मध्ये कुलदीप यादवने चांगली खेळी केली होती. पण आता गेल्या 10 सामन्यात त्याने फक्त 4 गडी बाद केले आहे.
अशी असू शकते ड्रीम इलेव्हन टीम
डेविड वॉर्नर (कर्णधार), ऑयन मॉर्गन (उपकर्णधार), सुनील नरेन, दिनेश कार्तिक, शुमभमन गिल, मनीष पांडे, शिवम मावी, कुलदीप यादव, रशिद खान, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद नवी (ही टीम खेळाडूंच्या कामगिरीनुसार अंदाजे आहे, यात तुम्ही तुमच्या पद्धतीने बदल करू शकता. )
असे आहे दोन्ही संघ
कोलकाता नाइट रायडर्स : सुनील नरेन, शुमभमन गिल, दिनेश कार्तिक, ऑयन मॉर्गन , नितेश राणा, आंद्रे रसेल, राहुल त्रिपाठी, पेट कमिंस, कुलदीप यादव, शिवम मावी आणि संदीप वॉरियर
सनरायजर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर , जॉनी बेअरस्टो , मनीष पांडे, प्रियम गर्ग, केन विलियमसन किंवा मोहम्मद नबी, विजय शंकर, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि टी नटराजन