पुणे, 31 डिसेंबर: 2022 वर्ष संपून 2023 उजाडायला काही तासांचाच अवधी उरला आहे. नवीन वर्षाची उत्सुकता सर्वानाच लागलेली आहे. नव्या वर्षात काय घडणार आहे हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा असते. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा नवीन वर्षात काय घडेल. 2023 मध्ये पुणे महानगरपालिका निवडणूका होणार असून यामध्ये शहराचं राजकीय भविष्य काय असेल? हे वर्ष राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार आणि भाजपचे चंद्रकांत पाटील यांना कसे जाणार आहे याची माहिती ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी दिली आहे. राजकीय घडामोडींचं वर्ष 2023 मध्ये पुण्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. यामध्ये भाजपा पक्ष आणि राष्ट्रवादीचे भवितव्य ठरवले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार आणि भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यामुळे पुण्याचे चित्र पलटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. अजित पवार यांची कुंभ रास असून त्यांची साडेसाती सुरू आहे. तर चंद्रकांत पाटील यांची कर्क रास आहे 17 जानेवारी नंतर शनी हा मकरेतून कुंभेत जाणार आहे आणि येथून कर्क राशीला शनीचा ढिया म्हणजेच पणवती सुरू होणार आहे. तसेच एप्रिल नंतर जे काही ग्रह बदलणार आहे त्याचे मोठे पडसाद पुण्यामध्ये उमटतील, असं सिद्धेश्वर मारटकर यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीची सत्ता येण्याची दाट शक्यता गुरु हा एप्रिल पर्यंत मीन राशिमध्ये आहे आणि त्यानंतर मेष राशीमध्ये जाईल. गुरु जर मेष राशीमध्ये जाण्या अगोदर निवडणुका झाल्या तर पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये भाजपची सत्ता राहील. पण एप्रिल नंतर जर निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादीची सत्ता येण्याची दाट शक्यता निर्माण होते. राष्ट्रवादी सोबतच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल देखील एप्रिल नंतरचा काळ चांगला राहील. पण यामध्ये महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी हा प्रमुख पक्ष म्हणून पुढे येईल. यासोबतच एप्रिल नंतर अजित पवारांना जास्त महत्त्व प्राप्त होईल, असं सिद्धेश्वर मारटकर सांगतात. Video : पुणेकरांच्या आयुष्यात 2023 मध्ये काय होणार बदल? ज्योतिषांनी वर्तवलं भविष्य भाजपचं काय होईल? चंद्रकांत पाटलांच्या कर्क राशि पासून शनी हा आठवा आहे. तो 17 जानेवारी नंतर कुंभेत जाणार आहे. तो चंद्रकांत पाटलांसाठी चांगला नाही. या शनीमुळे चंद्रकांत पाटलांना माघार घ्यावी लागेल अथवा त्यांना अपयशाला सामोरे जावे लागेल. हाच काळ भाजपसाठी देखील चांगला नाही. भाजपने जर एकट्या निवडणूक लढवली तर त्यांना यश मिळणे कठीण असेल. त्यांना जर यश मिळवायचे असेल तर त्यांना इतर पक्षांची देखील साथ घ्यावी लागेल.
Video : नाशिककरांसाठी 2023 ठरणार का लकी? रोजगार, पाऊस, पीकपाण्याबद्दल ज्योतिषांनी वर्तवलं भविष्य
तसेच गुरूपालट हा राष्ट्रवादी पक्षाच्या सिंह लग्नाला पाचवा येत असल्यामुळे राष्ट्रवादीला येणाऱ्या काळात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. यासाठी अजित पवार यांनी इतर पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यातूनच राष्ट्रवादी प्रमुख पक्ष म्हणून महाविकास आघाडीमध्ये पुढे येईल. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सप्टेंबर पर्यंत आहे ते नगरसेवक टिकवणे हे सर्वात मोठे आव्हान असेल.