जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Video : पुणेकरांच्या आयुष्यात 2023 मध्ये काय होणार बदल? ज्योतिषांनी वर्तवलं भविष्य

Video : पुणेकरांच्या आयुष्यात 2023 मध्ये काय होणार बदल? ज्योतिषांनी वर्तवलं भविष्य

Video : पुणेकरांच्या आयुष्यात 2023 मध्ये काय होणार बदल? ज्योतिषांनी वर्तवलं भविष्य

Yearly horoscope 2023 : पुणेकरांना 2023 कसं जाईल? शहरात काय बदल होतील याचं भविष्य ज्योतिषांनी व्यक्त केलं आहे.

  • -MIN READ Local18 Pune,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे, 31 डिसेंबर : नवीन वर्षाची चाहून लागल्यानं सध्या सगळीकडं आनंदाचं वातावरण आहे. सरत्या वर्षात घडलेल्या घटनांचा आढावा घेत असतानाच नवीन वर्षात काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 2023 हे वर्ष पुण्यासाठी कसं असेल याबाबतची माहिती ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितली आहे. कसं असेल 2023? ‘2023 हे वर्ष खरंतर मोठ्या घडामोडी घडणाऱ्या आहेत. यामध्ये मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्याबाबतची काही प्रकरणं समोर येतील. त्यामधून त्यांची मानहानी देखील होऊ शकते.  पण, पुणे शहरासाठी मात्र हे वर्ष चांगलं आहे. कोरोना आणि गोवर या संसगर्गजन्य रोगाची सध्या भीती असली तरी मार्चपर्यत तो संपुष्टात येईल. त्यामुळे पुणेकरांनी याला घाबरण्याची गरज नाही, असं मारटकर यांनी सांगितले. येणाऱ्या काळामध्ये पुण्यामध्ये पर्जन्यमान व्यवस्थित राहील. पुण्याला पाण्याची कमतरता भासणार नाही. पुण्याच्या आजूबाजूची शेतीवर चांगले परिणाम होतील. पुण्यामध्ये ढगफुटीसारखी गंभीर परिस्थिती उद्धभवण्याची शक्यता कमी आहे. संपूर्ण देशभरात उष्णता वाढून पर्जन्यमान कमी होईल. पण, पुण्यामध्ये उष्णता वाढली तरी पर्जन्यमान व्यवस्थित असेल. 30 वर्षानंतर आलेल्या खास योगाचा मुंबईवर काय होणार परिणाम? राशीचक्रकारांनी सांगितलं भविष्य पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंयय. 12 जानेवारीनंतर शहरातील गुन्हेगारीला आळा बसेल. तरुणांसाठी येत्या काळात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतीस. त्यामुळे पुण्याची प्रगती होईल,’ असं आशादायी भविष्य त्यांनी सांगितलं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    राजकीय क्षेत्रामध्ये येत्या काळामध्ये  खूप चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यानंतर याबाबतची प्रचिती येण्यास सुरूवात होईल. पुण्यामध्ये सध्या महत्त्वकांक्षी प्रकल्प येत असून त्यामधून शहराची प्रगती होत आहे. त्याचबरोबर पर्यावरणासाठी आवश्यक बाबींकडे भविष्यात पुण्यामध्ये भर दिला जाईल. पर्यावरणाच्या विषयावर गांभीर्यानं लक्ष दिल्यास सध्या सर्वत्र वाढणाऱ्या ग्लोबल वार्मिंगच्या प्रश्नाचा पुणेकरांना त्रास होणार नाही, ’ असं 2023 सालाचं भविष्य मारटकर यांनी वर्तवलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात