नाशिक 30 डिसेंबर : 2022 संपून 2023 लवकरच सुरू होत आहे. नव्या वर्षात काय घडणार आहे हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा असते. प्रत्येक जण यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून माहिती मिळवत असतो. त्याचबरोबर आपण ज्या शहरात राहतो, त्या शहरासाठी नवीन वर्ष कसं जाईल? शहाराची विकासकामं मार्गी लागणार का? पाऊस वेळेवर पडणार का? उद्योगधंद्यांना ‘अच्छे दिन’ येणार का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. नाशिकसाठी 2023 कसं असेल? याची माहिती ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी दिली आहे. ज्योतिष शास्त्रीय सिद्धांत काय सांगतो? आकाशातील ग्रहांच्या स्थितीप्रमाणे ग्रहांचे शूभ किंवा अशुभ परिणाम मानवी आयुष्यावर होतात, असं ज्योतिष शास्त्र मानते. 2023 मध्ये कन्या लग्न येत असून बुधातिथ्य योग आहे. याचाच अर्थ नाशिककरांसाठी हे वर्ष चांगले जाणार आहे. नाशिकरांच्या आयुष्यावर शुभ परिणाम करणारं हे वर्ष असल्याचं भविष्य धारणे यांनी सांगितलं आहे. राजकीय भवितव्य काय ? राजकीय घडामोडींसाठी जानेवारी महिना थोडा त्रासदायक आहे. शनी महाराज संक्रातीनंतर कुंभ राशीला जातील. त्यानंतर म्हणजेच साधारण फेब्रुवारी महिन्यापासून राज्याचा विकास जलद गतीनं होईल. सध्या काही अडचणी येत आहेत मात्र फेब्रुवारीपासून सर्व काही सुरळीत होईल, असं भविष्य दिसत असल्याचं भारणे यांनी स्पष्ट केले. या 6 राशींसाठी नवीन वर्ष असेल शुभ; इन्कम सोर्स वाढतील, आरोग्यही ठणठणीत शेतकऱ्यांसाठी कसं आहे 2023? शेतकऱ्यांसाठी 2023 वर्षे चांगल जाणार आहे.पीकपाणी मुबलक प्रमाणात येईल अस दिसत आहे.नाशिक शहरासह राज्यभरात देशात धान्याचा तुटवडा होणार नाही. धान्य निर्यातीचं प्रमाण वाढेल. धान्याच्या किमती देखील स्थिर राहतील. शेतकऱ्यांना जास्त फटका बसणार नाही. शेतमालाच्या किंमती जास्त घसरणार नाही. शेतकरी नवीन वर्षात आनंदी असतील, असं आशादायी भविष्य धारणे यांनी सांगितलं आहे.
नाशिकच औद्योगिक भविष्य काय ? नवीन वर्षात नाशिकमध्ये चांगल्या प्रमाणे उद्योग धंदे वाढतील.मात्र मे ऑगस्ट दरम्यान नाशिक शहरात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होईल,काही मोठ्या कंपन्या या वर्षात नाशिक शहरात गुंतवणूक करू शकतात. या कंपन्यांमध्ये नाशिकसह जिल्हा भारतील तरुणांना नोकऱ्या मिळू शकतात. पर्यावरण घडामोडी काय असतील ? ‘पर्यावरणाचा विचार करता यावेळेस पावसाचे प्रमाण जास्त असेल तसेच उष्णतेचा देखील फटका नागरिकांना बसू शकतो. सर्वाधिक तापमानाची नोंद या वर्षात होऊ शकते. पाऊस जास्त होणार असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. हवामाचा अंदाज सतत बदलत राहील. भूकंप तसेच नैसर्गिक आपत्ती सारख्या घटना घडू शकतात, मात्र जीवतहानी होईल इतक्या मोठ्या प्रमाणात त्या होणार नाहीत. नाशिक शहरावर कोणतंही मोठं संकट येणार नाही.’ नववर्षात या 3 राशीच्या लोकांचे लव्ह लाईफ झकास! यांना घ्यावी लागेल काळजी गोदावरीला मोठा पूर येणार पाऊस जास्त प्रमाणात होणार असल्यामुळे साहजिकच गोदावरी नदीला जास्त पूर येईल. त्यामुळे नागरिकांचं काही प्रमाणात नुकसान होईल. पण, ते मोठं नुकसान नसेल, त्यामधून ते सहज सावरू शकतील, असं भविष्य धारणे यांनी सांगितलं आहे.