मराठी बातम्या /बातम्या /पुणे /मुंडे समर्थकांच्या नाराजीची लाट पुण्यात धडकली, उपाध्यपदाचा दिला राजीनामा

मुंडे समर्थकांच्या नाराजीची लाट पुण्यात धडकली, उपाध्यपदाचा दिला राजीनामा

 प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तरात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे...

प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तरात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे...

प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तरात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे...

पिंपरी चिंचवड, 11 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) नुकताच पार पडला. पण, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. बीडमध्ये (Beed) 36 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे (Munde supporters resign) दिले आहे. या नाराजी नाट्याची लाट आता पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) पोहोचली आहे.

पिंपरी चिंचवड शहर ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष दत्ता कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तरात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचा कट्टर समर्थक म्हणून आपण राजीनामा दिला असं कायंदे यांनी स्पष्ट केलं. त्यांनी आपला राजीनामा पिंपरी चिंचवडचे ओबीसी मोर्चा अध्यक्ष भाऊसेठ रासकर यांच्याकडे सुपुर्द केला आहे.

पुण्यासह कोकणात पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

तर दुसरीकडे, बीड भाजपमध्ये राजीनामा (resignation) सत्र सुरू झालं आहे. आतापर्यंत एकूण 36 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

भाजपच्या 11 तालुका अध्यक्षांनंतर आता जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. संतोष हांगे, सारिका राणा डोईफोडे, रामराव खेडकर या जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. यासोबतच स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राणा डोईफोडे यांनीही राजीनामा दिला आहे.

बहिणीला भेटायला गेली अन्...; सपासप वार करत पतीनंच काढला काटा, पुण्यातील घटना

आत्तापर्यंत 36 पदाधिकारी यांनी राजीनामे दिले आहेत. या राजीनामा सत्रांमुळे एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्यांपासून जिल्हा पदाधिकारी यांच्यात तीव्र नाराजी आहे. तसेच पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे समर्थकांमध्ये संतापची लाट आहे.

भाजपचे कार्यकर्ते आणि मुंडे समर्थक राजीनामा देत असताना पंकजा मुंडे यांचे मौन आहे. त्यांच्यासमोर कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे आव्हान आहे.

First published:
top videos

    Tags: Beed news, Dhananjay munde, Pankaja munde, Pimpari chinchavad, Pimpri chinchawad, Pune, Resignation, Resigns, Support