पुणे, 11 जुलै: जवळपास तीन आठवड्यांच्या ब्रेकनंतर राज्यात पुन्हा मान्सूननं वापसी (Monsoon Comeback) केली आहे. यानंतर आता कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे. आजपासून पुढील चार दिवस कोकण (Konkan) आणि घाट परिसरात (Ghat area) जोरदार पावसाची (Rain) शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचाही (Heavy rainfall) इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. अरबी समुद्रातील वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आज राज्यात सर्वत्र मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पण उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मात्र अद्याप अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट गडद झालं आहे. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांची पीकं जळून गेली आहे. हेही वाचा- कोरोनाचा परिणाम! मुंबईत जन्मदरामध्ये मोठी घट; ‘ही’ कारणं आली समोर अरबी समुद्रातील अनुकूल वातावरणामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान किनारपट्टीच्या भागात मेघगर्जनेसह वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे. आाज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी याठिकांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, कोल्हापूर, यवतमाळ आणि जालना या जिल्ह्यानं हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हेही वाचा- बापरे! डेल्टानंतर आता कोरोनाचा नवा व्हेरिएंटचा भारतात शिरकाव, एकाचा मृत्यू आज मध्य महाराष्ट्रातही बहुतांशी ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात अंशतः कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं विदर्भातही बहुतांशी ठिकाणी ढगांचा गडगडाट होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.