पुणे, 11 जुलै: पुण्यातील हडपसर परिसरात एका व्यक्तीनं आपल्या पत्नीवर चाकूनं सपासप वार करत तिची हत्या (Husband killed wife) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं अनैतिक संबंधाच्या (Immoral Relation) रागातून ही हत्या केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अंजली नितीन निकम असं हत्या झालेल्या 22 वर्षीय महिलेचं नाव आहे. तर नितीन बापू निकम असं 33 वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. दोघंही पती-पत्नी भोसरीतील चक्रहास वसाहतीत वास्तव्याला होते. पण मागील काही काळापासून पती नितीन हा मृत अंजलीवर नेहमी चारित्र्यावरून संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात अनेकदा वादही झाले आहेत. अलीकडेच मृत अंजलीचं आपल्या पतीसोबत कडाक्याचं भांडण झालं. यामुळे तिने पतीच्या त्रासाला कंटाळून हडपसर गाडीतळ येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे आली. हेही वाचा- नागपुरच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती; एक ब्रेकअप आणि तीन मर्डरचा थरार पत्नी बहिणीकडे गेल्याचा राग मनात धरून आरोपी पती नितीननं पत्नी अंजलीच्या हत्येचा कट रचला. शनिवारी दुपारच्या सुमारास आरोपी नितीन आपल्या पत्नीला घेण्यासाठी मेव्हुणीच्या घरी गेला. याठिकाणी पत्नीला घेऊन तो, आपल्या मुलाला घेण्यासाठी सासूच्या घराकडे निघाला. यानंतर पत्नीला घरी घेऊन जात असताना, आरोपीनं गाडीतळ बंटर शाळेच्या आवारात निर्जन ठिकाणी गाडी थांबवली आणि आपल्या पत्नीवर चाकूनं सपासप वार केले. हेही वाचा- जावयाच्या पार्श्वभागात मिरची पावडर व कारले खोचून मारहाण, सासरच्या मंडळीचे कृत्य या हल्ल्यात पत्नी अंजली गंभीर जखमी झाल्या. यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. हत्येची घटना उघडकीस येताच हडपसर गाडीतळ याठिकाणी राहणारी मृताची बहीण वैशाली अर्जुन गायकवाड यांनी हडपसर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.