मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'राजा उदार नाही तर उधार झाला', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

'राजा उदार नाही तर उधार झाला', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

. केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी कायद्यांबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

. केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी कायद्यांबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

. केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी कायद्यांबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

पुणे, 25 डिसेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर (Farmer) जाऊन मोठा गाजावाजा केला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत करायला हवी, अशा मोठमोठ्या बाता त्यांनी केल्या होत्या. पण काय झालं? राजा उदार नाही, तर उधार झाला. शेतकऱ्यांच्या हाती भोपळा आला, अशी परिस्थिती सध्या महाविकास आघाडी सरकारची झाली आहे, असा सणसणीत टोला भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लगावला.

हेही वाचा......याचे दीड हजार होतील, तसे 4 होतात; आजोबांकडून लाच मागणारा LIVE VIDEO

देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील शेतकरी संवाद मेळाव्यात संबोधित केलं. केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी कायद्यांबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

राज्य सरकारचा मेमोरेडम उशीरा गेला. केंद्रीय पथक येत असतं चर्चा करण्यासाठी येत असतं पूर्नपाहणी कधी करत नाही. अधिकारी व गावकरी यांच्याबरोबर पथकानं चर्चा केली. केंद्रीय पथक योग्य तो अहवाल देईल. केंद्र सरकारनं SDRFपैसे खर्च करण्याची परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत बंगल्यावर 90 कोट्यवधी रुपये आहेत, दारूच्या अनुज्ञपती कमी करण्यासाठी पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत. सरकारनं ही नाटकबाजी बंद करायला हवी, अशा शब्दांत फडणवीस यांनी सरकारवर खोचक टीका केली.

देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरडवाहू जमिनीसाठी 25 हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केलं होतं. तर त्यात अजित पवार यांनी भर टाकली. उद्धव ठाकरे 50 हजार म्हणतात मात्र बागायतदारांना दीड लाख रुपये मदत मिळायला हवी, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ते शेतकऱ्यांचे खरे कैवारी असल्याचं आम्हाला वाटलं. पण, शेतकऱ्यांच्या हाती भोपळा आला, असं सांगत फडणवीस यांनी अजित पवार यांना डिवचलं.

हेही वाचा...शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, टोल नाक्यावर धडकली गाडी!

फडणवीस यांनी सांगितलं की, पंतप्रधान पिक विमा योजना आम्ही राज्यात आणली होती. त्यातून शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळाले. मात्र, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच त्यांनी ही विमा योजना बासनात गुंडाळली. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis, Pune, Udhav thackeray