...याचे दीड हजार होतील, तसे 4 होतात; आजोबांकडून लाच मागणारा LIVE VIDEO

...याचे दीड हजार होतील, तसे 4 होतात; आजोबांकडून लाच मागणारा LIVE VIDEO

रेशन कार्डच्या नोंदीसाठी हजारो रुपयांची आकारणी करून जनतेची कशी लूट केली जाते, हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

  • Share this:

बीड, 25 डिसेंबर: बीड जिल्हा पुरवठा विभागात (Beed) डाटा एन्ट्रीसाठी पैशाची मागणी आणि पैसे स्वीकारतानाचा (officer accepting bid) व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. रेशन कार्डच्या नोंदीसाठी हजारो रुपयांची आकारणी करून जनतेची कशी लूट केली जाते, हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पुरवठा विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची पोलखोल झाली असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

हेही वाचा..मुंबईत तरुणीवर लैंगिक अत्याचार करून रेल्वेतून फेकलं! शिवसेना नेत्या संतापल्या

जिल्हाधिकारी, तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या वरदहस्ताने राजरोस जनतेची लूट केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पुरवठा विभागातील व्हिडीओ समोर आल्यानं नागरिकांमधून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच दोषी अधिकाऱ्यांला निलंबित करण्याची मागणी केली.

पुरवठा विभागात डाटा एन्ट्री करण्यासाठी तसेच रेशन कार्डच्या कामासाठी येत असलेल्या नागरिक व रेशन दुकानदारांची खुले आम लूट सुरू आहे. डाटा एंट्री ऑपरेटर कॅमेऱ्यासमोर पैसे स्वीकारताना देखील त्याला कुठलीही लाज वाटली नाही. हाच डाटा एंट्री ऑपरेटर निवडणूक विभागात देखील काम करताना दिसून येतो. निवडणूक विभागामध्ये पुरवठा विभागाच्या डाटा एंट्रीचे काम करत असताना आलेल्या नागरिकांकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

निवडणूक विभागात व पुरवठा विभागात एकच व्यक्ती काम करत आहे. त्याच्याकडे दोन्ही विभागाचे लॉगिन आयडी असल्याने हे काम त्याच्या घरी सुद्धा होत असल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे. या संदर्भात बीडचे तहसीलदार श्रीकांत शिंदे यांच्याशी या प्रकारा संदर्भात विचारणा केली असतात व्हिडीओची सत्यता तपासणीचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

दुसरीकडे, बीडमध्ये बीडीएस विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. बीडीएसच्या विद्यार्थ्यांना जनरल मेडिकल प्रॅक्टिसची परवानगी द्या, या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं.

हेही वाचा...चार दिवसांनंतर नवरी म्हणाली; 'पोळ्या लाटायला आले होते, जबरदस्तीने लावलं लग्न'

दंतचिकित्सा ही अलोपॅथी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त शाखा आहे. सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या वतीने आयुर्वेदातील पदवीधर विद्यार्थ्यांना 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करायची परवानगी देण्यात आली आहे. त्यातच एमबीबीएस व बिडीएस विद्यार्थ्यांच्या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात 70 ते 80 टक्केपर्यंत अभ्यासक्रम सारखाच असतो. यामुळे बीडीएसच्या पदवीधरांकांना जनरल मेडिकल प्रॅक्टिसची परवानगी द्यावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 25, 2020, 4:29 PM IST

ताज्या बातम्या