Home /News /mumbai /

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, टोल नाक्यावर धडकली गाडी!

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, टोल नाक्यावर धडकली गाडी!

या अपघातात गाडीच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातातून एकनाथ शिंदे बचावले आहे.

    ठाणे, 25 डिसेंबर : शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती  समोर आली आहे. सुदैवाने या अपघातातून एकनाथ शिंदे बचावले आहे. त्यांना या अपघातात किरकोळ दुखापत झाली. मात्र, गाडीचे नुकसान झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या टोयटा एसयुव्ही गाडीला गुरुवारी 24 डिसेंबर रोजी नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर अपघात झाला. या अपघातात गाडीच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातातून एकनाथ शिंदे बचावले आहे. त्यांच्या अंगठ्याला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती उत्तम आहे, असे वृत्त टीव्ही 9 वृत्तवाहिनीने दिले आहे. महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना RBI ने केला रद्द, ठेवीदारांवर काय होणार परिणाम? दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालघरमधील विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांच्या फोटोसमोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली. या तरुणीने मोडलं फडणवीसांचं रेकॉर्ड; 21 व्या वर्षीच देशातली सर्वांत तरुण महापौर या प्रकरणावर  न्यूज18 लोकमतशी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 'अशा अघोरी घटना होतात त्यावर विश्वास ठेवायची गरज नाही. अशा प्रवृत्ती आहेत त्यावर पोलिसांमार्फंत कारवाई केली आहे. अशा कृत्याने कोणतीही गोष्ट घडत नसते, समाजाला अशा पासून सावध राहिले पाहिजे' असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या