पुणे, 29 जानेवारी : पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी असू शकते असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वतृळात चांगलीच खळबळ उडाली. त्यानंतर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देऊनही या विषयाची चर्चा सुरूच आहे. आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देऊन त्यावर पडदा टाकला आहे, सारखा सारखा तो निषय उगाळत बसू नका, त्याला आता तीन वर्ष झाली आहेत, त्यापेक्षा आपण महागाई, बेरोजगारी आणि सध्या जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर बोलू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी असू शकते असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी यावर बोलणं टाळलं. जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देऊन त्यावर पडदा टाकला आहे, सारखा सारखा तो निषय उगाळत बसू नका, त्याला आता तीन वर्ष झाली आहेत, त्यापेक्षा आपण महागाई, बेरोजगारी आणि सध्या जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर बोलू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : mlc election : सत्यजित तांबेंना भाजपचा पाठिंबा? विखे पाटलांनी सांगितलं मतदानाचं गणित
शरद पवारांची प्रतिक्रिया
दरम्यान पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर खुद्द शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते शनिवारी कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. आता या घटनेला तीन वर्ष झाली आहेत, त्यामुळे आता हा विषय कशाला काढता असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, BJP, Devendra Fadnavis, Jayant patil, NCP, Sharad Pawar