महाराष्ट्र बँक बंद करण्याचा सरकारचा डाव - राज ठाकरे

महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या अटके प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत, सरकारला महाराष्ट्र बँक हळुहळू बंद करायची आहे असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2018 03:55 PM IST

महाराष्ट्र बँक बंद करण्याचा सरकारचा डाव - राज ठाकरे

मुंबई, ता.26 जून : महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या अटके प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत, सरकारला महाराष्ट्र बँक हळुहळू बंद करायची आहे असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. एवढ्या मोठ्या बँकेच्या अध्यक्षाला अटक होते आणि ती गोष्ट मुख्यमंत्र्यांना माहिती नाही हे शक्यच नाही, मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत असा आरोपही राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकारपरिषदेत केला.

महाराष्ट्र बँकेला हळुहळू बंद करून बँक ऑफ बडोदामध्ये विलिन करण्याचा सरकारचा डाव असल्याची माहिती आहे. हे खरं असेल तर भयंकर आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या सहकारी बँकेत सर्वात जास्त नोटा बदलून दिल्या गेल्या हे स्पष्ट झाल्यावरही कारवाई होत नाही.

आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांच्यावरही कारवाई नाही, मराठ्यांना अटक करता तशी कारवाई शहा आणि कोचर यांच्यावर करण्याची हिंम्मत आहे असा सवालही राज यांनी केला. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासंबंधीच्या समितीवर रवींद्र मराठे होते.

निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी प्लास्टिक बंदी- राज ठाकरे

सदाभाऊ खोत यांना राजकीय धक्का, सुरेश पाटलांनी दिला राजीनामा

Loading...

त्यांनी सरकारच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई केली असेल. बँकेच्या अध्यक्षांनाच अटक केल्यावर ठेविदारांचा विश्वास कसा राहिल, तो डळमळीत व्हावा हाच सरकारच्या कारवाईचा हेतू आहे. डीएसके कुलकर्णी यांचं प्रकरण आणि मराठेंचा काहीही संबंध नाही असही राज ठाकरे यांनी सांगितलं.

निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी प्लास्टिक बंदी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. 'प्लास्टिकबंदी हा सरकारचा निर्णय की एका खात्याचा'. कोणाला आलेला झटका हा सरकारचा निर्णय असू शकत नाही असं म्हणत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंवर टीका केलीय.

किम जोंग यांनी उत्तर कोरियात मायकल जॅक्सनच्या गाण्यावर घातली बंदी !

महिलांसाठी सर्वात धोकादायक देश आहे भारत

प्लास्टिक बंदीवर मुख्यमंत्र्यांचं मौन का ? असा सवाल मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पक्षाची भूमिक मांडणारा मेसेज फिरत असून प्लास्टिक पिशव्या वापरल्याच पाहिजेत ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही असं स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनी प्लास्टिक बंदीसाठी इतकी घाई का ? असा सवाल विचारत हा निर्णय सरकारचा आहे की विशिष्ट खात्याचा ? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 26, 2018 03:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...