उत्तर कोरिया, 26 जून : हुकूमशहा किम जोंग उन हे उत्तर कोरियात नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. आताही ते त्यांच्या एका अजब आदेशामुळे चर्चेत आले आहेत. तो म्हणजे जगातील सगळ्यात लोकप्रीय पॉप गायक 'मायकल जॅक्सन'चे संगीत आता कोरियात ऐकता येणार नाही. हो किम जोंग यांना मायकल जॅक्सन अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्याचा डान्स आणि गाणं ऐकण्यासाठी कोरियात बंदी घालण्यात आली आहे.
पण किम यांच्या या निर्णयावर उत्तर कोरियातील जनता मात्र नाराज आहे. कारण उत्तर कोरियात मायकल जॅक्सनचे अनेक चाहते आहेत.
तर ते असं आहे की मुळात किम जोंग यांना मायकल जॅक्सन नाही तर अमेरिकेची कोणतीही गोष्ट आवडत नाही. त्यांना अमेरिकेबद्दल प्रचंड तिरस्कार आहे.
त्यामुळे ज्याच्या गाण्याचे उत्तर कोरियन चाहते आहेत त्या मायकल जॅक्सनच्या गाण्याला आणि डान्सला किम जोंग यांनी बंदी घातली आहे.