नवी दिल्ली, 26 जून : भारत महिलांसाठी जास्त असुरक्षित आणि धोकादायक देश आहे. थाॅम्सन राॅयटर्स फाऊंडेशन या संस्थेच्या सर्वेनुसार भारतात महिलांवर जास्त लैंगिक अत्याचार होतात. वेश्या व्यवसायातही महिलांना ढकललं जातं. सीरिया आणि अफगाणिस्तानपेक्षाही भारत महिलांपेक्षा जास्त धोकादायक असल्याचा दावा या सर्वेक्षणात केलाय. हेही वाचा आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक- मोदी VIDEO अॅक्टिव्हाला भरधाव वेगातल्या चारचाकीची धडक, एकाचा मृत्यू सदाभाऊ खोत यांना राजकीय धक्का, सुरेश पाटलांनी दिला राजीनामा कोल्हापूरात कंटेनर आणि स्कूल बसची जोरदार धडक, 2 जण ठार 26 जखमी 2011मध्ये असाच सर्वे केला होता. त्यात अफगाणिस्तान, काँगो, पाकिस्तान, भारत आणि सोमालिया हे देश महिलांसाठी धोकादायक होते. पण या वर्षी भारत अग्रक्रमावर आहे. भारतात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात 83 टक्के वाढ झालीय. या सर्वेक्षणानुसार भारत मानव तस्करी आणि महिलांना सेक्स रॅकेटमध्ये ढकलण्यात जास्त पुढे आहे. राॅयटर्सच्या म्हणण्याप्रमाणे महिला आणि बाल विकास मंत्रालयानं यावर बोलायला नकार दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.