सदाभाऊ खोत यांना राजकीय धक्का, सुरेश पाटलांनी दिला राजीनामा

रयतच्या प्रदेशाध्यक्षपदाचा सुरेश पाटील यांनी राजीनामा दिला आहे. रयत क्रांती संघटनेपासून पाटील यांचा काडीमोड घेतला आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2018 01:27 PM IST

सदाभाऊ खोत यांना राजकीय धक्का, सुरेश पाटलांनी दिला राजीनामा

कोल्हापूर, 26 जून : सदाभाऊ खोत यांना मोठा राजकीय धक्का मिळाला आहे. कारण रयतच्या प्रदेशाध्यक्षपदाचा सुरेश पाटील यांनी राजीनामा दिला आहे. रयत क्रांती संघटनेपासून पाटील यांचा काडीमोड घेतला आहे. त्यांनी नव्या मराठा क्रांती संघटनेची स्थापना केली आहे. आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये या नव्या संघटनेची घोषणा सुरेश पाटील यांनी केली आहे.

राज्यातील 20 संघटना एकत्र येऊन नव्या संघटनेची स्थापना करणार येणार असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. सुरेश पाटील यांच्याकडून नव्या संघटनेची घोषणा करण्यात आली आहे.

कोल्हापूरात कंटेनर आणि स्कूल बसची जोरदार धडक, 2 जण ठार 26 जखमी

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी 9 जुलै आणि 9 ऑगस्टला मराठा क्रांती संघटना आंदोलन करणार असल्याचा माहिती सुरेश पाटील यांनी दिली आहे. 9 ऑगस्टला क्रांती संघटनांकडून राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे रयत संस्थेला खिंडार पडलं असं म्हणायला हरकत नाही.

सुरेश पाटील यांनी मांडलेली वेगळी चूल म्हणजे मंत्री सदाभाऊ खोत यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकीय धक्का मानला जातोय. राज्यातल्या वेगवेगळ्या 15 हून अधिक संघटना या क्रांती संघटनेमध्ये सहभागी झाल्या असून या संघटनेच्या कार्यकारिणीची घोषणाही आज कोल्हापूरमध्ये करण्यात आली आहे.

Loading...

हेही वाचा...

वडाळ्यात इमारतीच्या पार्किंगची भिंत कोसळल्यामुळे दोस्ती बिल्डर्सच्या विरोधात गुन्हा दाखल

आणीबाणीवरून राजकारण तापलं ! देशात ४ वर्षांपासून अघोषित आणीबाणी, मनसेची टीका

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 26, 2018 01:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...