मुंबई, 26 जून : निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी प्लास्टिक बंदी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. ‘प्लास्टिकबंदी हा सरकारचा निर्णय की एका खात्याचा’. कोणाला आलेला झटका हा सरकारचा निर्णय असू शकत नाही असं म्हणत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंवर टीका केलीय. प्लास्टिक बंदीवर बोलण्यासाठी राज ठाकरे यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. प्लास्टिक बंदीवर मुख्यमंत्र्यांचं मौन का ? असा सवाल मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पक्षाची भूमिक मांडणारा मेसेज फिरत असून प्लास्टिक पिशव्या वापरल्याच पाहिजेत ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही असं स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनी प्लास्टिक बंदीसाठी इतकी घाई का ? असा सवाल विचारत हा निर्णय सरकारचा आहे की विशिष्ट खात्याचा ? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. काल पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. राज ठाकरे हे कोर्टापेक्षा मोठे आहेत का असा सवाल त्यांनी केला होता. तसच आदित्य ठाकरेंना विरोध करण्यासाठीच मनसेनं प्लास्टिकबंदी विरोधात भूमिका घेतली असाही आरोप त्यांनी केला होता. हेही वाचा महिलांसाठी सर्वात धोकादायक देश आहे भारत किम जोंग यांनी उत्तर कोरियात मायकल जॅक्सनच्या गाण्यावर घातली बंदी ! VIDEO अॅक्टिव्हाला भरधाव वेगातल्या चारचाकीची धडक, एकाचा मृत्यू
आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक- मोदी
दंड वसुलीबाबत ते म्हणाले, प्रत्येकाच्या खिशात काही ५ हजार रुपये नसतात. अनधिकृत झोपडपट्ट्या इथं वसवल्या जातात त्याला दंड काय ? ते म्हणाले, जगाच्या प्रत्येक देशात प्लास्टिक बंदी नाहीये. मुख्यमंत्र्यांचं याबाबत एकही स्टेटमेंट नाही. संपूर्ण आयुष्य प्लॅस्टिकनं गुंडाळलंय. राज ठाकरेंच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे प्लास्टिक बंदीची काय घाई होती ? वरळीत प्रदर्शन होतं हे सुद्धा लोकांना माहिती नव्हतं प्रत्येकाच्या खिशात काही ५ हजार रुपये नसतात जगाच्या प्रत्येक देशात प्लास्टिक बंदी नाहीये सीएमचं याबाबत एकही स्टेटमेंट नाही हा सरकारचा निर्णय की एका खात्याचा ? संपूर्ण आयुष्य प्लास्टिकनं गुंडाळलेलं आहे मला पडलेले प्रश्न आपल्यासमोर मांडतोय राज्यातल्या अनेक नद्या दूषित आहेत, त्याच्या स्वच्छतेचं काय झालं ? नद्यांमध्ये औद्योगिक पाणी सोडलं जातंय मनपांची जबाबदारी पार पाडत नाहीये म्हणून कचरा स्वत:च्या जबाबदा-या झटकण्यासाठी ही बंदी मनपांनी किती कचरा कुंड्या दिल्या आहेत ? परदेशात कशा सुविधा दिल्या जातात हे पाहावं शहरांमध्ये कचरा कुंड्या नाहीत तर मग ग्रामीण भागात कशा असतील ? डंपिंग ग्राऊंडचा मुद्दा तसाच प्रलंबित नाशिकमध्ये वाॅर्डनिहाय खत निर्मिती केली नाशिकमध्ये प्रयोग यशस्वी होतो मग पुणे, मुंबईत का नाही ? मनपा आपलं काम ठीक करत नाही मग लोकांना दंड का नाही ? अनधिकृत झोपडपट्ट्या इथं वसवल्या जातात त्याला दंड काय ? अचानक ५ हजारांचा दंड का ? मुंबईचा कारभार पाहण्यासाठी माणसं २०० प्लास्टिक व्यापारांकडून निवडणुकीचा फंड मागितलाय हे सगळं नोटबंदीसारखं आहे नागरिकांनी प्लास्टिकचा वापर जबाबदारीने करावा आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला तर बंदीची वेळच येणार नाही सरकारनं आपलं काम नीट करावं आणि मग उपदेश करावा प्लास्टिक बंदी करताना पर्याय काय ?