पुणे,ता.18 जून : फक्त 20 रुपयांसाठी रिक्षाचालकाने पुण्यात एका प्रवाशाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाड्यावरून प्रवाशी आणि रिक्षाचालकामध्ये वाद झाला. वादाचं रूपांतर भांडणामध्ये आणि भांडण हाणामारीवर गेलं. यात प्रवासी गंभीर जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. शनिवारी गणेशपेठ भागात ही घटना घडली.
VIDEO: मालाड स्टेशनवर चालत्या लोकलखाली एका तरुणाची आत्महत्या,दृश्य सीसीटीव्हीत कैद
VIDEO रणथंभौरच्या जंगलात एकमेकांशी भिडले दोन वाघ !
मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला या रिक्षाचालकाने आपल्याच रिक्षामधून पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात नेले. मात्र मारहाण केल्याचं मात्र त्यानं दडवून ठेवलं. पोलीसांना संशय आल्यावर जेव्हा त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा त्यांना याच रिक्षाचालकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने प्रवाशाला लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचं आढळून आलं.
आपलं बिंग फुटलं हे लक्षात येताच रिक्षाचालक रुग्णालयातून पळ काढला. पोलीसांनी या रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. दरम्यान मारहाण केलेल्या प्रवाशाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. फक्त 20 रुपयांसाठी भाड्यावरून झालेल्या वादातून रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Auto riksha, Murder, Passenger, Pune