S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

माहेरून पत्नी येत नसल्यानं जावयानं कापलं सास-याचं नाक

या सगळ्या प्रकारामध्ये सासरे नागनाथ शिंदे यांच्या नाकाचा शेंडा तुटला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 18, 2018 12:24 PM IST

माहेरून पत्नी येत नसल्यानं जावयानं कापलं सास-याचं नाक

लातूर, 18 जून : बायको माहेरून परत येत नसल्यामुळे वैतागलेल्या जावयानं चक्क सासऱ्याचं नाक कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी लातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सासऱ्याचं नाक कापणाऱ्या जावयाचा शोध पोलीस घेताहेत.

लातूरच्या भादा गावात ही घटना घडली आहे. संतोष यादव असं आरोपीचं नाव असून त्याचं लग्न रेखा शिंदे हिच्याशी झालं होतं. बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या रेखाला संतोषनं मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी मध्यस्थीसाठी मध्ये पडलेल्या सास-याच्या नाकावर संतोषनं वार केला.

या सगळ्या प्रकारामध्ये सासरे नागनाथ शिंदे यांच्या नाकाचा शेंडा तुटला आहे. जखमी नागनाथ यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.


हेही  वाचा...

VIDEO फुलांच्या विक्रीवरून दोन गटात तुफान हाणामारी

गौरी लंकेश हत्या प्रकरण : मास्टर माईंडची ओळख पटली?

'डॉ.दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरेंच्या हत्येचा तपास केव्हा लागणार'?

'असले' जीवघेणे स्टंटस् करू नका!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2018 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close