राजस्थान, 18 जून : राजस्थानच्या रणथंभौर नॅशनल पार्कमध्ये दोन वाघांचा एकमेकांशी जोरदार संघर्ष झाला. झोन नंबर दोनमधील शेताच्या जवळ या वाघांची जोरदार भांडण झाली आणि त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघ T60 आणि T39 वाघिणीमध्ये हा रोमांचक संघर्ष झाला आहे. त्यांच्या या भांडणाच्या गर्जना संपूर्ण जंगलात ऐकायला येत होत्या. हा व्हिडिओ वाघ विशेषज्ञ धीरेन्द्र गोधा यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात शुट केला आहे. त्यांनी शुट केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाला आहे. वाघांची ही जोरदार भांडण पाहताना पर्यटकंही उत्साहीत झाले होते आणि तितकेच घाबरले होते. पण या काही वेळाच्या भांडणानंतर वाघिणीने तिथून पळ काढला आणि पर्यटकांना सुखरूप असल्याचा श्वास घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







