मुंबई, १८ जून : मुंबईतल्या मालाड स्टेशनवर चालत्या लोकलखाली एका तरुणानं आत्महत्या केलीये. ही आत्महत्या सीसीटीव्हीत कैद झालीये. जीवाचा थरकाप उडवणारी ही दृश्यं आहेत.
१२ जूनची प्लॅटफॉर्म क्रमांक ३वरची ही घटना आहे.वेगानं येणाऱ्या लोकलखाली या तरुणानं जीव दिला. या तरुणाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. पण हे पाहून खरोखरच जीव इतका स्वस्त झालाय का असा विचार मनात येतोय. प्लॅटफार्मवर सहज चालणारा हा तरुण मनात इतकं भयंकर काही घेऊन जात असेल असं वाटतंही नाही. या जीवघेण्या दृश्यानंतर मन सुन्न होऊन जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







