एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांचा राजीनामा, या पक्षातून मिळणार विधानसभेचं तिकीट?

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांचा राजीनामा, या पक्षातून मिळणार विधानसभेचं तिकीट?

अवघ्या ठाणे पोलीस क्राईम डिपार्टमेंटचे अधिकारी, कर्मचारी यांनी प्रदीप शर्मा यांची भेट घेऊन त्यांना निरोप दिला. तर 36 वर्षांची सेवा सोडताना खुप दुःख होत आहे असंही ते म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 13 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकांआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून जोरदार आऊटगोईंग झालं असून शिवसेना आणि भाजपमध्ये मेगाभरती सुरू आहे. आता पोलीस खात्यातूनही आऊटगोईंग सुरू झालं असं म्हणावं लागेल. कारण, एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी पोलीस खात्याला राम राम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी मला नालासोपारा मतदार संघातून उमेदवारी दिल्यास मी मोहिम फत्ते करून दाखवेन असंही प्रदीप शर्मा म्हणाले.

'मी दाऊद, छोटा राजन, लष्कर ए तोयबा, बबलू श्री, वास्तव यांच्यासारख्या गँगस्टर आणि दहशतवाद्यांशी दोन हात केले आहेत. त्यामुळे माझ्यासाठी ठाकूर मंडळी मोठी नाही.' असं थेट आव्हान प्रदीप शर्मा यांनी हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांना दिलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी प्रदीप शर्मा हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

'बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या प्रेमापोटी शिवसेना हा पक्ष निवडला असून मी जेव्हा निलंबित झालो होतो तेव्हा 'धाडसाची धिंड' हा बाळासाहेबांचा अग्रलेख मी आजही सांभाळून ठेवला आहे. मी जेव्हा साडेतीन वर्षे जेलमध्ये होतो तेव्हा मला एकनाथ शिंदे यांनी जी मदत केली, ती मी कधीच विसरू शकणार नाही. मिळेल ती जबाबदारी मी पार पाडायला तयार आहे.' असं स्पष्ट करत प्रदीप शर्मा यांनी आज पोलीस खात्याचा निरोप घेतला. यावेळेस अवघ्या ठाणे पोलीस क्राईम डिपार्टमेंटचे अधिकारी, कर्मचारी यांनी प्रदीप शर्मा यांची भेट घेऊन त्यांना निरोप दिला. तर 36 वर्षांची सेवा सोडताना खुप दुःख होत आहे असंही ते म्हणाले.

इतर बातम्या - महाजनादेश यात्रेत तरुणीचा उद्रेक.. मुख्यमंत्र्याच्या ताफ्यावर फेकला शाईचा फुगा

मुख्यमंत्रीच तयार करणार शिवसेनेचीही 'यादी', उद्धव ठाकरेंच्या खुलाश्याने सगळ्यांनाच धक्का!

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता असताना सगळ्यांना उत्सुकता आहे ती ‘युती’च्या जागावाटपाची. ‘युती’ होणार हे आता सगळ्यांनीच मान्य केल्यानं जागावाटपाचं काय होणार? कोण मोठा भाऊ? कोण छोटा भाऊ? याची चर्चा जोरात सुरू आहे. दोन्ही पक्षांमधले ज्येष्ठ नेते चर्चेच्या फेऱ्या करताहेत. मित्र पक्षांना 18 जागा सोडण्याचं मान्य झालंय. शिवसेना 50:50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचंही बोललं जात होत. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केलाय. त्यांच्या या खुलाश्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून लवकरच ‘युती’च्या जागावटपाची घोषणा होईल अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

शिवसेना 50 टक्के फॉर्म्युल्यावर ठाम

भाजप आणि शिवसेनेदरम्यान जागावाटपासाठी बोलणी सुरू आहे. ही बोलणी अंतिम टप्प्यात आली असं बोललं जात असतानाच शिवसेना समसमान जागावाटपावर ठाम असल्याची माहिती पुढे आली होती. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे असंही बोललं जात होतं. शिवसेना पुन्हा एकदा 50:50 च्या जागा वाटपासाठी आग्रही आहे. दोन्ही पक्षांनी 288 पैकी 144-144 जागा वाटून घेण्याची शिवसेनेची भूमिका आहे.

भाजपच्या 'या' नेत्याने शिवसेनेच्या मतदारसंघात जाहीर केली स्वत:चीच उमेदवारी

तर भाजपची जास्त जागांची मागणी आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधल्या ज्येष्ठ लोकांना यावर तोडगा काढवा लागणार आहे. घटक पक्षांना देण्यात येणाऱ्या 18 जागांपैकी 9-9 जागा दोन्ही पक्षांनी आपल्या कोट्यातून द्याव्यात अशी शिवसेनेची मागणी आहे तर 174 भाजप आणि 114 शिवसेना = 288 जागा असा भाजपचा प्रस्ताव आणि या एकूण जागावाटप करुन प्रत्येकी 9 जागा घटक पक्षांना देण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे. उद्धव ठाकरे यांच्या आजच्या खुलाश्यामुळे युतीत सर्व अलबेल असल्याचे संकेत मिळत आहेत.

VIDEO: दारूच्या अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसालाच महिलांनी केली मारहाण

First Published: Sep 13, 2019 04:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading