महाजनादेश यात्रेत तरुणीचा उद्रेक.. मुख्यमंत्र्याच्या ताफ्यावर फेकला शाईचा फुगा

'पिचड यांना उमेदवारी देऊ नका... महापोर्टल त्वरित बंद करा... महिलांवर होणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष द्या', अशी मागणीही शर्मिला येवले हिने केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2019 03:40 PM IST

महाजनादेश यात्रेत तरुणीचा उद्रेक.. मुख्यमंत्र्याच्या ताफ्यावर फेकला शाईचा फुगा

नगर, 13 सप्टेंबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला शुक्रवारी नगरमधून सुरू झाली. त्याचदरम्यान एका तरुणीचा उद्रेक झाला. तिने 'सीएम गो बॅक'च्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीवर शाईचा फुगा फेकल्याचा दावा केला आहे. धक्कादायक म्हणजे तरुणी गाड्याच्या ताफ्याच्या विरुद्ध दिशेला धावत सुटल्याची माहिती मिळाली आहे. शर्मिला येवले असे या तरुणीचे नाव असून ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ता असल्याचे समजते.

सरकारचं महापोर्टल बंद करावं, पिचडांना उमेदवारी देऊ नये, राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, ही मागणी करत अकोले येथे शर्मिली येवले या तरुणीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांचा मुख्य ताफा येण्याच्या अगोदर पुढे असलेल्या वाहनावर तिने निळी शाई फेकण्याचा प्रयत्न केला. ताफा निघून गेल्यानंतर पाच मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अकोले येथे सभेच्या ठिकाणी दाखल झाला. पोलिसांनी अद्याप संबंधित तरुणीवर कोणतीही कारवाई केली नाही. तिने फेकलेली शाई रोडवर पडलेली दिसत होती. तिच्या मागण्या रास्त असतील, मात्र पद्धत चुकीची वाटते.तिचा अपघात होऊ शकला असता, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

सत्तेचा ज्यांना माज आला होता त्यांना जनतेने घरी बसवलं- मुख्यमंत्री

-सभेला एवढी गर्दी म्हणजे आपला जनादेशच मिळाला....

-महाजनादेश यात्रा महाराष्ट्रातील जनतेच्या आशिर्वादासाठी...

Loading...

-राज्यातील जनता आमच्यासाठी दैवत...

-भारतीय जनता पक्षाची जनतेत जाण्याची परंपरा...

-जे केले ते सांगतोय, जे राहीलं ते जाणून घेतोय...

-अनेकांनी यात्रा सुरू केल्या...

-इतरांच्या यात्रेला कार्यालयही भरत नाही...

-सत्तेचा ज्यांना माज आला होता त्यांना जनतेने घरी बसवलं...

-पंचविस वर्ष तरी जनता आपल्याला स्वीकारणार नाही...

समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार

महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या नाशिक येथे 19 सप्टेंबरला समारोप होणार आहे. समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. महाजनादेश यात्रेत महाजनादेश सहभागी होणार असून ते नाशिक येथे होणाऱ्या सभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून यात्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली आहे.

SPECIAL REPORT: भाजपचा आत्मविश्वास ओव्हर कॉन्फिडन्स तर ठरणार नाही?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2019 03:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...