Home /News /news /

सरकार अस्थिर झालंय का? पवारांसोबतच्या गुप्त बैठकीवर संजय राऊतांचा मोठा खुलासा

सरकार अस्थिर झालंय का? पवारांसोबतच्या गुप्त बैठकीवर संजय राऊतांचा मोठा खुलासा

महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सत्ताधारी पक्षाला खांदा देणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात सोमवारी रात्री उशिरा बैठक पार पडली.

    मुंबई, 26 मे : एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे राजकारण अशी अवस्था सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतेय. राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्या खडाजंगी सुरू आहे. सध्या राजकारण पेटलं आहे ते मातोश्रीवर झालेल्या गुप्त बैठकीमुळे. महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सत्ताधारी पक्षाला खांदा देणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात सोमवारी रात्री उशिरा बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्यातील सरकार अस्थिर झालं असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. राज्यात कोरोनाचं संकट सांभाळण्यात अपयश आल्यामुळे ही बैठक झाल्याचंही बोललं जात आहे. पण यावर संजय राऊतांनी ट्वीट करून मोठा खुलासा केला आहे. 'कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी. जय महाराष्ट्र !!' अशा शब्दात राऊतांनी विरोधकांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न केला. मातोश्रीवर शरद पवारांसोबत झाली गुप्त बैठक, महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप? खरंतर, येत्या गुरूवारी महाविकास आघाडी सरकारचे 6 महिने पूर्ण होतील. पण त्याआधीच पक्षावर अस्थिरतेचं सावट असल्याची चर्चा रंगली. त्यात राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही दिल्लीत बरीच उठाठेव केल्याचीही माहीती हाती लागली आहे. कारण गेली 3 ते 4 दिवस लागोपाठ मोठे नेते राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची सातत्याने भेट घेत आहेत. या भेटींमागे मोठं राजकारण होत असल्याचीही माहीती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असं दिसतंय. पण महाविकास आघाडीमध्ये मात्र, सगळं काही ठीक असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात महासंकट, राज्याची तुलना देशाशी केली असता धक्कादायक आकडेवारी समोर खरंतर, राज्यात इतिहासिक सत्ता बदल झाला आहे. तीन वेगळ्या विचारांच्या पक्षांनी एकत्र येत संसार सुरू केला आहे. या सगळ्या मोठ्या आणि सत्तास्थापनेच्या कठोर वेळीसुद्धा शरद पवारांनी कधी मातोश्रीची पायरी चढली नव्हती, तेदेखील या बैठकीसाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचंही समजतं आहे. येत्या गुरुवारी महाविकास आघाडीला 6 महिने पूर्ण होतायत त्याआधीच या सरकारवर सत्ता जाण्याचे ढग दाटले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मराठी सिनेसृष्टीवर शोककळा, अभिनेते गिरीश साळवी यांचे निधन संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: BJP, Congress, Coronavirus, NCP, Sharad pawar, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या