Covid-19: महाराष्ट्रात महासंकट, राज्याची तुलना देशाशी केली असता धक्कादायक आकडेवारी समोर

Covid-19: महाराष्ट्रात महासंकट, राज्याची तुलना देशाशी केली असता धक्कादायक आकडेवारी समोर

महाराष्ट्र (Maharashtra) आणि मुंबई (Mumbai) ची ही परिस्थिती बर्‍याच देशांपेक्षा धोकादायक आहे. जगात फक्त 19 देश आहेत, जिथे महाराष्ट्रापेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मे : भारतात कोरोनाव्हायरस (Coronavirus)संसर्गाचा धोका काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. विशेषत: महाराष्ट्रात हे रोखणं आता अशक्य होत चाललं आहे. केवळ महाराष्ट्र राज्यातच 50 हजार लोकांना या धोकादायक विषाणूची लागण झाली आहे. यापैकी 30 हजार मुंबईतच आहेत. महाराष्ट्र (Maharashtra) आणि मुंबई (Mumbai) ची ही परिस्थिती बर्‍याच देशांपेक्षा धोकादायक आहे. जगात फक्त 19 देश आहेत, जिथे महाराष्ट्रापेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

भारत सरकारच्या (Indian Government) अधिकृत आकडेवारीनुसार, सोमवारपर्यंत देशातील 1.38 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 50,231 लोक महाराष्ट्रातील आहेत. कोव्हिड-19 (Covid-19) मुळे आतापर्यंत 4021 लोकांनी प्राण गमावले आहेत. यापैकी 1635 लोक एकट्या महाराष्ट्रातील होते. म्हणजेच, महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह लोकांपैकी 36% लोक. त्याचप्रमाणे देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 40% मृत्यू महाराष्ट्रातील आहेत.

भारतातील (India) इतर राज्यांविषयी बोलायचं झालं तर महाराष्ट्रा नंतर तामिळनाडू (Tamil Nadu) आणि गुजरात (Gujarat) मध्ये बरीच प्रकरणं आढळली. तामिळनाडूमध्ये 16 हजारांहून अधिक लोक तर गुजरातमध्ये 14 हजारांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यांच्यानंतर दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशची नंबर येतो.

महाराष्ट्र देश असता तर 20 व्या क्रमांकावर असता

आतापर्यंत 19 देशांमध्ये कोव्हिड-19च्या 50 हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच महाराष्ट्र जर देश असता तर तो देशांच्या यादीमध्ये 20 व्या क्रमांकावर असता. तसा, या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्र करू शकतो पाकिस्तानशी सामना

वर्ल्डोमीटरच्या वेबसाइटनुसार, पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 56,350 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यापैकी 1167 लोक मरण पावले आहेत. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा क्रमांक 19वा आहे. महाराष्ट्रात संक्रमित 50,231 पैकी 1635 लोकांचा मृत्यू झाला आहे.

जर मुंबई देश असता तर ते 30 व्या क्रमांकावर असता

आतापर्यंत मुंबईत 30 हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची नोंद झाली आहे. जगातील फक्त 19 देश अशी आहेत जिथे कोव्हिड -19चे मुंबईहून अधिक रुग्ण आहेत. म्हणजेच मुंबई जर एक देश असला असता तर कोरोना बाधित देशांच्या यादीत 30 व्या क्रमांकावर असता.

संपादन - रेणुका धायबर

First published: May 26, 2020, 7:43 AM IST

ताज्या बातम्या