मराठी सिनेसृष्टीवर शोककळा, अभिनेते गिरीश साळवी यांचे निधन

मराठी सिनेसृष्टीवर शोककळा, अभिनेते गिरीश साळवी यांचे निधन

गिरीश साळवी हे एक उत्कृष्ट नट आणि दिग्दर्शक होते. त्यांची गाजलेली नाटकं आजही लोकांच्या मनात आहेत.

  • Share this:

मुंबई, 26 मे : अभिनेते गिरीश साळवी यांचं निधन झालं आहे. वरळी इथल्या राहत्या घरी त्यांचं दुःखद निधन झालं. अभिनेते आणि लेखक राजेश देशपांडे यांनी फेसबुक पोस्ट करुन या संदर्भात माहिती दिली आहे. गिरीश हे दिर्घ काळ आजारी होते.

बुद्धिबळ आणि झब्बू, चौऱ्याहत्तर पावसाळ्यांचा जमाखर्च, तुमचं आमचं सेम असतं, अनेक प्रायोगिक नाटकं त्यांनी केली. गिरीश साळवी हे एक उत्कृष्ट नट आणि दिग्दर्शक होते. त्यांची गाजलेली नाटकं आजही लोकांच्या मनात आहेत. वरळी इथल्या सुरप्रवाह संस्थेतर्फ़े राज्यनाट्य व कामगार नाटक स्पर्धेत ही नाटकं खूप गाजवली

पहिला राजा, समाधी, बाप हा बापच असतो, व आविष्कार संस्थेकडुन गाजलेली नाटक- जाता नाही जात, बुद्धीबळ आणि झब्बू, इंदू काळे व सरला भोळे, चौर्याहत्तर पावसाळ्याचा जमाखर्च तसेच अनेक मराठी मालिकांमध्ये गिरीश साळवी यांनी काम केलं होतं.

चं .प्र देशपांडे म्हणाले...

एक अत्युत्तम अभिनेता आणि माझा एक छान मित्र गेला! गिरीश पतकेने बसवलेला, त्याने अभिनीत केलेला, तेंडुलकरांचा, ' चौऱ्याहत्तर पावसाळ्यांचा जमाखर्च ' हा दीर्घांक म्हणजे त्याच्या अभिनयाचा कळस होता. सहज, साधा वावर, अर्थपूर्ण, उत्तम संवादोच्चारण, टायमिंग आणि नाटकाच्या लयीचे उत्तम भान, हे सर्वच त्यात पूर्णतेला पोचलेलं होतं. ग्रेटच. पण, वेडा होता. अरे, मी म्हणायचो, तू एक उत्तम अभिनेता आहेस, शरीराची काळजी घ्यायला हवीस. खरं आहे तुमचं, तो म्हणायचा.

मी कधी मुंबईला गेलो तर हे दोन गिरीश आणि मी यांचा गप्पांचा म्हणजे ग्रंथवाचनाचा कार्यक्रम हमखास ठरलेलाच असायचा. गिरीश पतके त्याची शेवटची गाडी पकडे, पण हा, मी एशियाडमधून पुण्याला रवाना होईपर्यंत माझ्याबरोबर असे. माझ्या ' बुद्धिबळ आणि झब्बू ' या नाटकात त्यानं केलेली एक भूमिका पाहणाऱ्यांच्या कायम लक्षात राहिलेली आहे. माझ्याच, ' झालं गेलं विसरून जाऊ ' या नाटकातही त्याने त्याच्या ग्रेट अभिनयाचा प्रत्यय दिला होता. सिद्धार्थ तांबे यांच्या, गिरीश पतकेनेच बसवलेल्या, ' जाता नाही जात ' या गाजलेल्या नाटकातही त्याच्या अभिनयाचा कारनामा होताच. हे सर्व ठीकच, पण, असे प्रेमळ मित्र असतात किती माणसाला ?

First published: May 26, 2020, 7:17 AM IST
Tags:

ताज्या बातम्या