जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Koffee With Karan: आलिया, रणवीरची कॉफी काऊचवर हजेरी, विकी-कतरिना नसणार का KWK चा भाग?

Koffee With Karan: आलिया, रणवीरची कॉफी काऊचवर हजेरी, विकी-कतरिना नसणार का KWK चा भाग?

Koffee With Karan: आलिया, रणवीरची कॉफी काऊचवर हजेरी, विकी-कतरिना नसणार का KWK चा भाग?

कॉफी विथ करण च्या (Koffee With Karan) नव्या सिजनमध्ये काही कलाकारांच्या असण्याने चाहते उत्सुक झाले आहेत तर काहींचा सहभाग नसल्याने चाहते निराश झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 2 जुलै: बॉलिवूडमध्ये ज्या शोची आतुरता आहे तो अर्थातच (Koffee With Karan season 7) कॉफी विथ करणचा सिझन 7. 07-07 म्हणजेच सात जुलै रोजी डिजनी प्लस हॉटस्टार वर या शोची सुरुवात होणार असून आता अखेर यात कोणकोणते पाहुणे आणि बॉलिवूड कलाकार दिसणार आहेत याचा खुलासा झाला आहे. इतके दिवस माध्यमांमध्ये चर्चा असणारी अनेक नावं या कार्यक्रमात सहभागी होताना दिसणार आहेत. (Karan Johar) करण जोहरने स्वतः सोशल मीडियावरून याबद्दल घोषणा केली असून या शोचा नवा विडिओ सुद्धा शेअर केला आहे. यामध्ये कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांपैकी काहींची झलक पाहायला मिळत आहे. (Ranveer-Alia) रणवीर आलिया ही जोडी पाहायला चाहत्यांना उत्सुकता आहे. तसंच जुग जुग जियोच्या निमित्ताने (Anil Kapoor) अनिल कपूर- (Varun Dhawan) वरूण धवन ही जोडी काऊचवर येणार आहे. बॉलिवूडच्या दोन बेस्ट फ्रेंड (Janhavi Kapoor) जान्हवी कपूर-सारा अली खान (Sara Ali Khan) सुद्धा शोमध्ये हजेरी लावणार आहेत. तसंच लायगर चित्रपटाच्या निमित्ताने विजय देवरकोंडा हा साऊथचा स्टार सुद्धा कॉफी काऊचवर येणार आहे. साऊथ अभिनेत्री समंथा रूथ सुद्धा या शोमध्ये लग्न या विषयावर बोलताना दिसणार आहे.

जाहिरात

विकी-कतरिना नसणार सहभागी? या व्हिडिओमध्ये एक गोष्ट मात्र चाहत्यांना निराश करणारी आहे. (Vicky- Katrina excluded from KWK?) अनेकांना विकी कौशल आणि कतरिना कैफ या नवविवाहित दाम्पत्याला कॉफी विथ करणमध्ये बघायची इच्छा होती. मात्र या टीझरमध्ये त्यांचा कुठेही सहभाग दिसत नसल्याने त्यांना शोमधून वगळलं आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. कदाचित त्यांना सरप्राईज पाहुणे म्हणून सुद्धा बोलवण्यात येऊ शकतं असा अंदाज बांधला जात आहे. पण सध्या तरी विकी कतरिनाचा कुठेच उल्लेख नसल्याने चाहत्यांचा काहीसा हिरमोड झाला आहे. हे ही वाचा-  Bahurangi Ashok: अशोक मामांचे सुपरहिट डायलॉग अन् भन्नाट मिम्स! तुम्ही पाहिलेत का? कॉफी विथ करण या शोबद्दल कुठे उत्सुकता दिसत आहे तर काही जणांच्या मते या शोला बॉयकॉट केलं पाहिजे. या शोबद्दल अनेक वर्षांपासून मिश्र प्रतिक्रिया आहेत. या शोचं प्रमोशन करताना या सगळ्या प्रतिक्रिया आणि ट्रोलिंगचा कम्माल वापर करण्यात आला होता. त्या प्रोमोची खूप चर्चा सुद्धा झाली होती. हळूहळू कार्यक्रमाचे पट्टे उलगडताना दिसत आहेत. आता प्रेक्षक आतुरतेने साथ जुलैची वाट बघत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात