अशोक मामांच्या पंचाहत्तरीनिमित्त एका खास कार्यक्रमाचं आयोजन झी मराठीवर येत्या रविवारी करण्यात आलं आहे. अशोक मामांच्या कारकिर्दीला सलाम करण्यासाठी अख्खी मराठीच नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्री सुद्धा एकत्र येऊन मामांना शुभेच्छा देणार आहेत.
या निमित्ताने झी मराठीने नेटकऱ्यांना एक भन्नाट चॅलेंज दिलं आहे. अशोक मामांचे काही फेमस डायलॉग, फेमस सीन घेऊन त्यावर मिम्स बनवण्याचा ट्रेंड सध्या प्रचंड viral होताना दिसत आहे. यातले काही अफलातून मिम्स बघूया. सौजन्य (zee5_marathi)
एका मीममध्ये नुकत्याच आलेल्या डॉक्टर स्ट्रेंज सिनेमाचं पोस्टर दिसत आहे. ज्यात बेनेडिक्ट कंबरबॅच या हॉलिवूड नटाचा फोटो काढून त्याजागी अशोक मामांचा फोटो लावला आहे. डॉक्टर स्ट्रेंजला दोनपेक्षा जास्त हात आहेत त्याची उपमा मामांच्या टॅलेंटला देऊन मामांची आजवर गाजलेली सगळी पात्र त्यांची नावं त्या मीम मध्ये दिलेली दिसत आहेत. मामांच्या भूमिकांना अशी हटके मानवंदना देण्यात नेटकरी यशस्वी झाले आहेत. सौजन्य (shubhamswadkar)
आम्ही मीमकर हे मीमचं पेज कायमच अशोक मामाचं काम जगासमोर आणताना दिसतं. त्यांनी अशोक मामांचा एक फोटो घेऊन चुरमुरे खाताना काहीजण अशी कृती करतात अशी तुलना करत भन्नाट मीम बनवलं आहे. सौजन्य (aamhimemekar)
हर्षल पाटील या तरुणाने नवरा माझा नवसाचा मधील मामांचा गाजलेला डायलॉग घेऊन त्यावर अफलातून मीम बनवलं आहे. सौजन्य (harshal_patil_007)
मीम मेकर मराठी यांनी ‘माझा पती करोडपती’ मधील कॅप्टन बाजीराव रणगाडे यांचा फेमस डायलॉग ‘आधी कुंकू लहाव’ घेऊन त्यावर कम्माल मीम बनवलं आहे. सौजन्य (meme.marathi.maker))
जेव्हा ओल्या हाताने कोणी फोन फिंगरप्रिंट लावून फोन अनलॉक करायला जातं तेव्हा काय होतं हे डी के मराठी मीम या पेजच्या अशी ही बनवाबनवी सिनेमाच्या लोकप्रिय डायलॉगचा वापर करून दाखवलं आहे. सौजन्य (dkmarathimeme)
मे ब्रेन नावाच्या मीम पेजने अशोक मामांचा सिंघम सिनेमातील अजय देवगणसोबत हताश बसलेला फोटो घेऊन कमाल मीम बनवलं आहे. सौजन्य (my___brain)
वी द मीमर्स या पेजच्या नवरा माझा नवसाचा सिनेमातील भन्नाट डायलॉग घेऊन त्यावर सुंदर मीम बनवलं आहे. सौजन्य (_we_the_memers_)
अंधार दाटला भवती… हे अशोक मामांच्या आवाजातलं गाणं आठवतं का? आलिया आणि रणबीरच्या सोनोग्राफी मशीनच्या फोटोमध्ये अशोक मामाचं हे गाणं ऍड करून मनीष चव्हाण या तरुणाने अफलातून मीम केलं आहे. आलिया आणि रणबीर जणू काही मामांच्या गाण्याचा आनंद घेत आहेत हे पाहून या नेटकाऱ्याच्या बुद्धीची दादच द्यायला हवी. सौजन्य (manish_chavan211)