बदल्यांमध्ये महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून मलाईदार कमाई, चंद्रकांतदादा पाटीलांचा गंभीर आरोप

बदल्यांमध्ये महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून मलाईदार कमाई, चंद्रकांतदादा पाटीलांचा गंभीर आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त खात्याने बदल्या करू नयेत असा आदेश दिला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरील स्थगिती उठवली, हे आश्चर्यकारक आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी 15 टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला असल्याची गंभीर टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. इतकंच नाही तर या प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणीदेखी चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त खात्याने बदल्या करू नयेत असा आदेश दिला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरील स्थगिती उठवली, हे आश्चर्यकारक आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्य सरकारने कोरोनामुळे बदल्या रोखल्या होत्या पण नंतर पंधरा टक्के बदल्यांना परवानगी देऊन त्यावरील स्थगिती उठवली. परिणामी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी मलाईदार ठिकाणी बदली करून देण्याचा बाजार मांडला. यामध्ये फार मोठ्या रकमेची उलाढाल झाली. तसेच ज्यांचे राजकीय लागेबांधे नाहीत आणि ज्यांच्याकडे आर्थिक बळ नाही अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला. या सर्व प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्याची गरज आहे.

नवनीत राणा यांना श्वास घ्यायला होतोय त्रास, तातडीने मुंबईला हलवलं

पुढे त्यांनी सांगितलं की, मुळात कोरोनाविषयीच्या उपाययोजनात सातत्य राखण्यासाठी चालू वित्तीय वर्षात बदल्या करू नयेत, असे सरकारचे मे महिन्यात धोरण होते तर जुलै महिन्यात राज्यातील कोरोनाची साथ अधिक गंभीर झाली असताना एकूण कार्यरत पदांच्या पंधरा टक्के बदल्या करण्याचा आदेश देण्याचे कारणच नव्हतं. तसेच नंतर त्याला 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचेही कारण नव्हते. राज्य सरकारच्या या धोरणातील गोंधळामुळे कोरोनाचे संकट असताना मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाचे स्थलांतर करण्याची वेळ आली. कोरोनामुळे शाळा बंद असताना मुलांसाठी नव्या ठिकाणी शाळेत प्रवेश मिळविण्याचे आव्हानही निर्माण झाले. तसेच कोरोनाची साथ रोखण्याच्या प्रयत्नांमध्येही अडथळा आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पोहोचलं रक्ताने लिहिलेलं पत्र, केली मोठी मागणी

ते म्हणाले की, कोरोनाच्या महासाथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्य सरकारच्या वित्त विभागाने 4 मे रोजी एक शासन निर्णय जारी केला आणि अनेक निर्बंध लादले. त्यामध्ये म्हटले होते की, चालू वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी अथवा कर्मचारी यांची बदली करू नये व याविषयीचा आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात येईल.

देवाच्या नावावर 39 हजारांची केली फसवणूक, डोंबिवलीत घडलेल्या प्रकाराचा CCTV समोर

कोरोनाच्या अनुषंगाने विविध विभागांनी केलेल्या उपाययोजनांमध्ये सातत्य राहणे आवश्यक आहे, असे कारण बदल्यांवर बंदी घालण्यामागे देण्यात आले होते. सामान्य प्रशासन विभागाने वित्त विभागाच्या 4 मे रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने 7 जुलै रोजी आदेश काढला आणि 31 जुलैपर्यंत 15 टक्के बदल्या कराव्यात असे स्पष्ट केले. तसेच नंतर 23 जुलै रोजी आणखी एक आदेश काढून बदल्यांची मुदत 10 ऑगस्ट केली. हा धोरण जाहीर करण्यातील विलंब आणि गोंधळ विशेष आहे असं टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 13, 2020, 5:56 PM IST

ताज्या बातम्या