जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नवनीत राणा यांना श्वास घ्यायला होतोय त्रास, तातडीने मुंबईला हलवलं

नवनीत राणा यांना श्वास घ्यायला होतोय त्रास, तातडीने मुंबईला हलवलं

नवनीत राणा यांना श्वास घ्यायला होतोय त्रास, तातडीने मुंबईला हलवलं

नवनीत राणा यांची तब्बेत आणखी बिघडली आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ मुंबईला रवाना करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अमरावती, 13 ऑगस्ट : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा नागपूरवरून मुंबईला उपचारासाठी रवाना झाल्या असल्याची महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. नवनीत राणा यांची तब्बेत आणखी बिघडली आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ मुंबईला रवाना करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. आमदार रवी राणादेखील त्यांच्यासोबत मुंबईत येणार आहेत. कोरोना झाल्याने नवनीत राणा नागपुरात उपचार घेत होत्या. आता त्या मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार आहेत. श्वास घ्यायला त्रास होत असून नवनीत राणा यांच्या छातीत मोठ्या प्रमाणावर दुखतं असल्याची माहिती मिळत आहेत. नवनीत राणा यांची तब्येत बिघडल्यामुळे कार्यकर्त्यांची चिंताही वाढली आहे. नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना नागपूरच्या ओखार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पोहोचलं रक्ताने लिहिलेलं पत्र, केली मोठी मागणी 6 ऑगस्ट रोजी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet rana)यांच्यासह त्याच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. धक्कादायक म्हणजे नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा (Ravi rana) यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला. Good News: कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, एकनाथ शिंदेंची माहिती राणा कुटुंबातील 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले. या सदस्यांमध्ये नवनीत राणांच्या मुले आणि सासू-सासऱ्यांचाही समावेश आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं कळल्यावरगेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही नवनीत राणा यांनी केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात