मराठी बातम्या /बातम्या /देश /

शरद पवारांसह उदयनराजे भोसले घेणार खासदारकीची शपथ, ही आहे संपूर्ण यादी

शरद पवारांसह उदयनराजे भोसले घेणार खासदारकीची शपथ, ही आहे संपूर्ण यादी

आज सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

आज सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

आज सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

  • Published by:  sachin Salve

अनुप गुप्ता, प्रतिनिधी

नवी दिल्ली, 22 जुलै : देशात कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाउनमुळे संसदेचं कामकाज पुढे ढकलण्यात आले होते. अखेर आज संसदेची दारं उघडण्यात येणार आहे. आज राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेणार आहे.

आज सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये होणार आहे.

या' देशात रस्त्यावर पडलाय मृतांचा खच, सडलेल्या अवस्थेत मिळाले 400 मृतदेह

देशभरातील एकूण 62 खासदार निवडून आले आहे. त्यांचा शपथविधी सोहळा हा अधिवेशनात पार पडणार आहे. आज फक्त मोजक्याच नेत्यांना शपथ दिली जाणार आहे. यामध्ये  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया, काँग्रेसचे दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे.

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. उदयनराजे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यामुळे पवारांना मोठा धक्का मानला जात होता. त्यानंतर उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन साताऱ्यातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली होती. पण, शरद पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपले खास विश्वासू  श्रीनिवास पाटील यांनी मैदानात उतरवले. अखेर या पोटनिवडणुकीत साताऱ्याच्या जनतेनं शरद पवारांची साथ देत राजेंना पराभवाची धूळ चारली होती. उदयनराजे यांनाही याची आधीच कुणकुण लागली होती. त्यामुळे त्यांनी राज्यसभेच्या जागेसाठी भाजपकडे आधीच अट घालून ठेवली होती. अखेर आज उदयनराजे पुन्हा एकदा राज्यसभेचे खासदार म्हणून मैदानात परत उतरणार आहे.

ही आहे शपथ घेणाऱ्या खासदारांची यादी

महाराष्ट्र

- शरद   पवार

- उदयनराजे  भोसले

- प्रियंका  विक्रम  चतुर्वेदी

- डॉ. भागवत  किशनराव  कराड

- राजीव   सातव

- रामदास अठावले

-  आंध्र प्रदेश

अयोध्या   रामी   रेड्डी   अल्ला

- पिल्ली   सुभाषचंद्र   बोस

- वेंकटारमन   राव   मोपीदेवी

अरुणाचल प्रदेश

- नबाम   रेबिया

आसाम

- बिस्वजीत   दायमेरी

- भुबनेश्वर   कालिता

बिहार

- प्रेमचंद  गुप्ता

- हरिवंश

- ए.  डी.   सिंह

- राम  नाथ  ठाकूर

- विवेक  ठाकूर

छत्तीसगड

- के. टी. एस.  तुलसी

गुजरात

- नरहरी   अमीन

- रमिलाबेन   बारा

- अभय  भारद्वाज

- शक्तिसिंह   गोहिल

हरियाणा

-  रामचंद्र   जांगडा

- दीपेन्द्र   सिंह

हिमाचल प्रदेश

- इंदू   बाला   गोस्वामी

झारखंड

- दीपक   प्रकाश

कर्नाटक

- अशोक   गस्ती

- इरन्ना  कडाडी

- मल्लिकार्जुन   खर्गे

मध्य प्रदेश

- ज्योतिरादित्य एम. सिंधिया

- दिग्विजय   सिंह

- सुमेर  सिंह  सोलंकी

'मी काही ट्रम्प नाही', उद्धव ठाकरेंच्या रोखठोक मुलाखतीचा प्रोमो रिलीज

मनिपूर

- महाराजा  संजाओबा  लेशंबा

मिझोराम

- के. वनलालविना

ओडिशा

- मुजीबुल्ला  खान

-  सुजीत   कुमार

- ममता  मोहंता

- सुभाष चंद्र सिंह

राजस्थान

- नीरज   डांगी

- राजेंद्र   गहलोत

- के. सी.  वेणुगोपाल

अभिनेत्री बिपाशा बासूच्या बोल्ड फोटोंवर चाहते फिदा,नवऱ्याने देखील केली अशी कमेंट

तामिळनाडू

-के.  पी.  मुन्नुस्वामी

- जी.  के.  वासन

पश्चिम बंगाल

- बिकास रंजन भट्टाचार्य

First published:

Tags: Sharad pawar, Udayanraje bhosale