मुंबई, 22 जुलै : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मॅरेथॉन मुलाखतीनंतर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत लवकरच पाहण्यास मिळणार आहे. 'लॉकडाउन आहेच, एक एक गोष्ट आपण सोडवत चाललो आहे, मी काही ट्रम्प नाही, जी आपली माणसं तडफडताना पाहू शकेल' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला प्रोमो आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. येत्या 25 आणि 26 जुलै रोजी दोन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.
या मुलाखतीत कोरोना आणि ठाकरे सरकारच्या सहा महिन्यांच्या कारभारावर विविध प्रश्नं विचारण्यात आले आहे. त्याचीच काहीशी झलक या प्रोमोमध्ये बघायला मिळाली आहे.
View this post on Instagram
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाउनवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच, 'मी टीकेची परवा करत नाही, त्यामुळे काही निर्णय घ्यायचे असेल तर घ्यावेच लागणार' असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
त्याचबरोबर, विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेतल्या पाहिजे अशी माझीही भूमिका आहे, पण राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता त्या न घेतलेल्या बऱ्या असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत शरद पवार यांनी 2014 ला भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा का देण्यात आला होता, याचा खुलासा केला आहे. तसंच 2019 ला महाविकास आघाडी सरकार कसे स्थापन करण्यात आले, याची पडद्यामागची गोष्ट शरद पवारांनी जाहीर केली होती. त्यामुळे आता या मुलाखतीतून उद्धव ठाकरे काय भूमिका मांडता हे पाहण्याचे ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shivsena, Uddhav Thackery, उद्धव ठाकरे, मुलाखत, संजय राऊत