सुक्रे, 22 जुलै : जगातील बहुतेक देश कोरोनाव्हायरसशी (Coronavirus) लढा देत आहे. जगभरात एक कोटी 48 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात एकट्या अमेरिकेत 39 लाखहून अधिक रुग्ण आहेत. मात्र दक्षिण अमेरिकेतील (South America) देशांची परिस्थिती सर्वात वाईट आहे. बोलिव्हिया (Bolivia) या देशातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 5 दिवसात शहरातील प्रमुख रस्ते आणि घरातून तब्बल 400 मृतदेह सापडले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृतदेहांची अवस्था पाहता यातील 85% पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे अंदाज वर्तवला जात आहे.
वृत्तसंस्खा AFPने दिलेल्या माहितीनुसार, बोलिव्हियातील कोचाबांबा या शहरातून तब्बल 191 शव बाहेर काढले. याशिवाय पाज शहरातून 141 मृतदेह. हे सर्व मृतदेह घरात सडत होते. राष्ट्रीय पोलीस संचालक कर्नल इव्हान रोजस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, यापूर्वी अशी भयंकर परिस्थिती कधीच पाहिली नव्हती. देशातील सर्वात मोठे शहर सांता क्रूझच्या रस्त्यांवरूनही 68 मृतदेह सापडले आहेत. केवळ या शहरातच देशात 50% कोरोना पॉझिटिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत या एका शहरात 60 हजाराहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
वाचा-पोलिसाने 13 व्या मजल्यावरुन मारली उडी; गुन्हेगाराला पकडण्यासाठी जीवाची बाजी
85% कोरोना पॉझिटिव्ह
रोजस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सापडलेल्या मृतदेहांपैकी 85% हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह होते. यातील काहींना इतर रोग तसेच उपासमारीमुळेही मरण पावले. नॅशनल अॅपिडेमिओलॉजी ऑफिसच्या म्हणण्यानुसार, सांता क्रूझनंतर पाज हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. इथं दररोज हजारो नवीन प्रकरणे समोर येत आहेत. फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनचे संचालक एंड्रियास फ्लोरेस म्हणाले की, 1 एप्रिलपासून आतापर्यंत अशा 3000 हून अधिक मृतदेह सापडले आहेत, त्यापैकी बहुतेकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. बोलिव्हियामध्ये 60 हजाराहून अधिक संक्रमणाची प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर 2200 मृतांची नोंद अधिकृतपणे झाली आहे.
वाचा-कोरोनाच्या संकटात मुंबईला आणखी एक धोका, लहान मुलांना होतोय 'हा' आजार
राष्ट्रपतीही कोरोना पॉझिटिव्ह
बोलिव्हियाचे अंतरिम राष्ट्रपती जीनिन अँझ (Jeanine Áñez) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जीनिन सध्या होम आयसोलेशनमध्ये असून सर्व कामे घरूनच करत आहे. जीनिन यांनी गुरुवारी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'नुकतीच मला कोरोनाची चाचणी झाली. माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.