Home /News /national /

काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचं निधन, संभाजीराजेंचा खासदारकीचा मार्ग मोकळा, मान्सून केरळात दाखल TOP बातम्या

काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचं निधन, संभाजीराजेंचा खासदारकीचा मार्ग मोकळा, मान्सून केरळात दाखल TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 17 मे :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्य न्यायमंत्री तसंच माजी राज्यसभा खासदार ज्येष्ठ समाजवादी नेते हुसेन मिस्त्रिखान दलवाई यांचं निधन झालं आहे. संभाजीराजे यांनी स्वत: ची संघटना स्थापन करून अपक्ष म्हणून राज्यसभा खासदारकीची निवडणूक (Rajya Sabha MP eleaction ) लढवणार अशी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याबाबत होकार दर्शवला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. दरम्यान, मान्सून केरळात दाखल झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हुसेन दलवाई यांचं निधन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्य न्यायमंत्री तसंच माजी राज्यसभा खासदार ज्येष्ठ समाजवादी नेते हुसेन मिस्त्रिखान दलवाई यांचं निधन झालं आहे. ते 99 वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हुसेन दलवाई यांच्या निधनामुळे काँग्रेसच्या गोटातून शोक व्यक्त केला जात आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. संभाजीराजेंचा खासदारकीचा मार्ग मोकळा, शरद पवारांनी दिला पाठिंबा छत्रपती संभाजीराजे (sambhaj raje) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. संभाजीराजे यांनी स्वत: ची संघटना स्थापन करून अपक्ष म्हणून राज्यसभा खासदारकीची निवडणूक (Rajya Sabha MP eleaction ) लढवणार अशी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याबाबत होकार दर्शवला आहे. शिवसेना आणि काँग्रेसही त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे येतील, असं वक्तव्य पवार यांनी केलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राणेंचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) आमची तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या शरीराविषयी टीका करू नये. तुम्ही कधी आरशात स्वत: चा चेहरा पाहावा मग विचार करावा, मी आधी शिवसेनेत होतो आता भाजपमध्ये आहे त्यामुळे बोलायला घाबरणार नाही, पुढच्या वेळी अजून पुढचं बोलेल, असा इशाराच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (naryan rane) यांनी दिला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सदाभाऊ खोतांनंतर तृप्ती देसाईंची केतकी चितळेसाठी मैदानात उडी अभिनेत्री केतकी चितळेनं (ketaki chitale) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर केलेल्या फेसबुक पोस्टमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आता या वादात  भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई ( Trupti Desai ) यांनी उडी घेतली आहे. राष्ट्रवादी आपल्याकडे असलेल्या गृहखात्याचा गैरवापर करत असल्याचा आरोपच देसाईंनी केला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. वसंत मोरेंची मनधरणी सुरूच? मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery)  यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मुद्याला विरोध करणारे मनसेचे नेते वसंत मोरे (vasant more) चर्चेत आले होते. वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून काढून टाकल्यामुळे ते इतर पक्षात जातील अशी चर्चा रंगली आहे. आता राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी फोन करून वसंत मोरेंना बैठकीला बोलावले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. केरळमध्ये मुसळधार पावसाचे संकेत मे महिन्याच्या मध्यानंतर नागरिक मान्सूनच्या प्रतीक्षेत असतात. त्यात यंदा मान्सून लवकर आल्याने नागरिकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. अखेर अंदमानच्या समुद्रात मान्सून (Monsoon Arrive) दाखल झाला आहे. जवळपास आठवडाभर आधीच मान्सून अंदमानात झाला आहे. पुढील 2 दिवस केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Monsoon, Sambhajiraje chhatrapati

    पुढील बातम्या