विशाल पाटील, प्रतिनिधीमुंबई, 16 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मुद्याला विरोध करणारे मनसेचे नेते वसंत मोरे (vasant more) चर्चेत आले होते. वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून काढून टाकल्यामुळे ते इतर पक्षात जातील अशी चर्चा रंगली आहे. आता राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी फोन करून वसंत मोरेंना बैठकीला बोलावले आहे.
पुण्यात मनसेमध्ये मागील काही दिवसांपासून घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरेंनी एकीकडे हिंदुत्वाचा मुद्या हाती घेऊन वाटचाल केली आहे. पण, त्यांच्याच निर्णयाला वसंत मोरे यांनी विरोध केला होता. गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न मनसेत सुरू आहे. आता राज ठाकरेंची पुण्यात सभा होणार आहे. त्यासाठी राज ठाकरे उद्या पुण्यात दाखल होणार आहे.
त्याआधी राज ठाकरे हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. या बैठकीला सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. पण, राज ठाकरे यांनी स्वत: वसंत मोरे यांना फोन बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले आहे. राज ठाकरे यांच्या फोनमुळे वसंत मोरे हे बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
(OMG! पगारात रोख रक्कम नाही तर 'सोनं' ऑफर करते ही कंपनी; काय आहे यामागील कारण?)
विशेष म्हणजे, मध्यंतरी राज ठाकरे यांनी मशिदीवर भोंगे काढण्याबद्दल आंदोलन पुकारले होते. राज्यभरात मनसे कार्यकर्ते मशिदीसमोर आंदोलन करत होते पण वसंत मोरे हे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते. त्यानंतर 8 मे रोजी वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
'दुपारी 3 वाजता मला राज ठाकरे यांचा मेसेज आला होता. पण मेसेज पाहिला नव्हता. त्यानंतर बाबर यांनी मला फोन केला आणि साहेबांनी भेटायला तातडीने बोलावले आहे, असं सांगितलं. त्यानंतर लगेच साहेबांना फोन केला. त्यानंतर त्यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये माझ्याशी बोलले, काय रे उठला नाही का, भेटायला ये, त्यानंतर मी तातडीने त्यांना भेटायला गेलो, असं वसंत मोरेंनी सांगितलं.
(आजीबाईंच्या एका एका उडीने वाढवली हृदयाची धडधड; वृद्धेचा जबरदस्त Skipping Video)
तसंच, मी तिरुपतीला कसा गेलो, याबद्दल माहिती दिली. तसंच त्यांनी तिरुपतीला जाण्यासाठी तिकीटं कधी बूक केली अशी विचारणा केली, फेब्रुवारी महिन्यात मी बुकिंग केलं होतं. अक्षय तृतीयेला मी तिरुपतीला जाणार हे पूर्वनियोजित होतं. गेल्या 20 वर्षांपासून मी जात असतो. त्यामुळे मला जावं लागलं, असं स्पष्टीकरण वसंत मोरे यांनी दिलं होतं. आता त्यानंतर राज ठाकरे यांनी बैठकीला बोलवण्याची ही दुसरी घटना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.