जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / सदाभाऊ खोतांनंतर तृप्ती देसाईंची केतकी चितळेसाठी मैदानात उडी, राष्ट्रवादीवर केला गंभीर आरोप

सदाभाऊ खोतांनंतर तृप्ती देसाईंची केतकी चितळेसाठी मैदानात उडी, राष्ट्रवादीवर केला गंभीर आरोप

, त्या पोस्टमध्ये तिने पवार असा उल्लेख केला होता. त्यात तिने शरद पवार यांचा कोणताही उल्लेख केला नव्हता.

, त्या पोस्टमध्ये तिने पवार असा उल्लेख केला होता. त्यात तिने शरद पवार यांचा कोणताही उल्लेख केला नव्हता.

, त्या पोस्टमध्ये तिने पवार असा उल्लेख केला होता. त्यात तिने शरद पवार यांचा कोणताही उल्लेख केला नव्हता.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 16 मे : अभिनेत्री केतकी चितळेनं (ketaki chitale) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर केलेल्या फेसबुक पोस्टमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आता या वादात  भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई ( Trupti Desai ) यांनी उडी घेतली आहे. राष्ट्रवादी आपल्याकडे असलेल्या गृहखात्याचा गैरवापर करत असल्याचा आरोपच देसाईंनी केला. वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेल्या वादग्रस्त पोस्टवरून झालेल्या कारवायीमुळे तृप्ती देसाई यांनी केतकीची पाठराखण केली आहे. एकीकडे   शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकीवर संपूर्ण महाराष्ट्रातून टीका होत आहे. मात्र पुण्यातून तृप्ती देसाई  यांनी केतकीची बाजू घेतली आहे. केतकी चितळेवर जी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली, त्या पोस्टमध्ये तिने पवार असा उल्लेख केला होता. त्यात तिने शरद पवार यांचा कोणताही उल्लेख केला नव्हता. हे प्रकरण कोर्टात टिकणार नाही,  राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखातं असल्यानं त्याचा गैरवापर केला जात आहे, असा दावाच तृप्ती देसाईंनी केला आहे. ( OMG! पगारात रोख रक्कम नाही तर ‘सोनं’ ऑफर करते ही कंपनी; काय आहे यामागील कारण? ) ‘केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तिच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पवारांचे समर्थक सुद्धा पोस्ट टाकत आहे, मग त्या समर्थकांवर सुद्धा अशी कारवाई का होत नाही, तेच कलम त्यांच्यावर का गेले जात नाही. केतकी चितळेवर ज्या प्रकारे कारवाई झाली आहे, तशीच कारवाई राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांवर झाली पाहिजे, अशी मागणीही देसाई यांनी केली. ( आजीबाईंच्या एका एका उडीने वाढवली हृदयाची धडधड; वृद्धेचा जबरदस्त Skipping Video ) केतकी चितळेनं याआधी सुद्धा अनेक आक्षेपार्ह विधानं केली होती, तिने छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही विधान केले होते, त्यावेळी कारवाई का गेली नाही. पण, आताच तिच्यावर गुन्हे दाखल केले गेले आहे. जर सत्तेचा वापर करून दबाव टाकला जात असेल तर आम्ही शांत बसणार नाही, आमच्यावर सु्द्धा असे गुन्हे दाखल झाले होते, जर कायदा समान असेल तर कारवाई समान झाली पाहिजे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात