Home /News /mumbai /

'फडणवीस यांच्या शरीरावर बोलू नका, नाहीतर...'राणेंचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

'फडणवीस यांच्या शरीरावर बोलू नका, नाहीतर...'राणेंचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

 आम्ही दगडापासून शिवसेना उभा केली. आम्ही देखील इतिहास बाहेर काढू शकतो. पण जिथे साहेबांचं नाव येत तिथे मी शांत बसतो.

आम्ही दगडापासून शिवसेना उभा केली. आम्ही देखील इतिहास बाहेर काढू शकतो. पण जिथे साहेबांचं नाव येत तिथे मी शांत बसतो.

आम्ही दगडापासून शिवसेना उभा केली. आम्ही देखील इतिहास बाहेर काढू शकतो. पण जिथे साहेबांचं नाव येत तिथे मी शांत बसतो.

    मुंबई, 16 मे : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) आमची तुम्हाला विनंती आहे की,  तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या शरीराविषयी टीका करू नये. तुम्ही कधी आरशात स्वत: चा चेहरा पाहावा मग विचार करावा, मी आधी शिवसेनेत होतो आता भाजपमध्ये आहे त्यामुळे बोलायला घाबरणार नाही, पुढच्या वेळी अजून पुढचं बोलेल, असा इशाराच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (naryan rane) यांनी दिला. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी नारायण राणे यांनी सामना दैनिक हातात घेऊन टीकास्त्र सोडले. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या वजनाचा उल्लेख करत टीका केली होती. फडणवीस यांच्या वजनामुळेच बाबरी पडली अशी खिल्ली मुख्यमंत्र्यांनी उडवली होती. त्यांच्या टीकेला आज राणेंनी उत्तर दिलं. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमची तुम्हांला विनंती आहे की,  तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या शरीराविषयी टीका करू नये. तुम्ही कधी आरशात स्वत: चा चेहरा पाहावा मग विचार करावा, मी आधी शिवसेनेत होतो,  आता भाजपमध्ये आहे त्यामुळे बोलायला घाबरणार नाही, पुढच्या वेळी अजून पुढचं बोलेल, असा इशाराही राणेंनी दिला. (Women T20 Challenge च्या तीन टीमची घोषणा, पण टीम इंडियाच्या दिग्गजच बाहेर!) आम्ही दगडापासून शिवसेना उभा केली. आम्ही देखील इतिहास बाहेर काढू शकतो. पण जिथे साहेबांचं नाव येत तिथे मी शांत बसतो. साहेबांना कधी मुलाचं प्रेम दिलं का, मुलगा म्हणून साहेबाना विश्वास पण दिला नाही. हिंदुत्व टोपीत नाही डोक्यात असावं लागते असे म्हणाले मग 2019 का गेलं तुमच्या,  यांच्या हृदयात राम आहे की रावण. हे रामही नाही रावणही नाही, यांच्याकडे विकृत बुद्धीची लोक आहेत, साहेब वरून पाहत असतील, तर काय म्हणत असतील, अशी टीकाही राणेंनी केली. (आला रे आला; अखेर अंदमानात Monsoon दाखल, केरळमध्ये मुसळधार पावसाचे संकेत) 'आमचे हिंदुत्व हे काम देणार आहे, असं तुम्ही सांगताय मग किती शिवसैनिकांना, किती लोकांना काम दिले. शेतकऱ्यांना 50 हजार नुकसान भरपाई देणार अशी घोषणा केली होती, त्याचं काय झालं. मुंबईची शांघाई करणार असं म्हणाले होते, पण नुसती दुर्गंधी येत आहे, अशी टीका राणेंनी केली. 'दिशा सॅलियन आणि सुशांत सिंह यांचे संसार उद्ध्वस्त केले. त्यांचे हाल करून मारले. आम्ही कल्याणकारी राज्य उभारले असं सांगण्याचे धाडस तरी आहे का? बाबरीच्या वेळी आम्ही पाडायला होतो असं सांगता, पण कुठे होता तुम्ही लोकं?  शिवसेनेत वाढीत उद्धव ठाकरे यांचा १ टक्के ही सहभाग नाही. मी याचा साक्षीदार आहे.  रमेश मोरे, जया जाधव यांची हत्या का झाली. जया जाधव यांनी बाळासाहेबांची सेवा केली होती, पण अजून मारेकरी का शोधले नाही, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या