मराठी बातम्या /बातम्या /देश /Corona पुन्हा पसरतोय, निवणुकांबाबात काँग्रेसचा मोठा निर्णय, सचिन वाझे माफीचा साक्षीदार TOP बातम्या

Corona पुन्हा पसरतोय, निवणुकांबाबात काँग्रेसचा मोठा निर्णय, सचिन वाझे माफीचा साक्षीदार TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

मुंबई, 2 जून : पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. तर मुंबईमध्येही 739 रुग्ण आढळून आले आहे. दहावी-बारावीचे निकाल यावर्षी वेळत लागण्याची शक्यता आहे. काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडी करण्यास तयार आहे. ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना नोटीस बजावली आहे. ईडीने जप्त केलेली प्रॉपर्टी रिकामी करा, अशी नोटीस खडसेंना बजावण्यात आली आहे. न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्या कथित पत्नी करूणा शर्मा मुंडे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहे.

शेतकरी धरणे आंदोलनाचा ‌दुसरा दिवस

पुणतांबा शेतकरी धरणे आंदोलनाचा ‌दुसरा दिवस आहे. कांदा तसेच मोफत फळे वाटून सरकारचा निषेध करण्यात येणार आहे.

साकी नाका बलात्कार आणि खुन प्रकरणी आज निकाल

साकी नाका बलात्कार आणि खुन प्रकरणी आज आरोपीला दिंडोशी न्यायालयात शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं होतं.

Corona पुन्हा पसरतोय

कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व जणांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. पण आता पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची (maharashtra corona cases) संख्या 1081 वर पोहोचली आहे. तर मुंबईमध्येही 739 रुग्ण आढळून आले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

दहावी-बारावीच्या निकालाचा मुहूर्त ठरला!

दहावी-बारावीचे निकाल यावर्षी वेळत लागण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल (HSC Result 2022) हा पुढच्या आठवड्यात लागेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल (SSC Result 2022) हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

आगामी निवडणुकांबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय,

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या (Maharashtra local body elections) पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Congress) एक मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडी करण्यास तयार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

'जेवढी चादर तेवढेच पाय पसरावे', नाना पटोलेंचा भाजपला टोला

महाराष्ट्रात सातत्याने राज्यसभेची निवडणूक परंपरेनं बिनविरोध झाली आहेत. मतदान संख्येच्या स्पष्टतेवर असते. जेवढी चादर तेवढेच पाय पसरावे, असा टोलाही पटोलेंनी भाजपला लगावला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

एकनाथ खडसेंना ईडीचा मोठा दणका

ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना नोटीस बजावली आहे. ईडीने जप्त केलेली प्रॉपर्टी रिकामी करा, अशी नोटीस खडसेंना बजावण्यात आली आहे. जमीन घोटाळ्या प्रकरणात ईडीने खडसेंची जागा जप्त केली होती. ती जागा रिकामी करण्याची नोटीस ईडीने बजावली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

धनंजय मुंडेंनी माझ्या आईची हत्या केली, करुणा शर्मांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्या कथित पत्नी करूणा शर्मा मुंडे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहे. 'धनंजय मुंडे यांच्या दबावामुळेच माझा आईने आत्महत्या केली. मुंडे यांची पहिली बायको असून त्याचे माझाकडे पुरावे आहे. त्यांनीच माझ्या आईची हत्या केली आहे, असा गंभीर आरोप करुणा शर्मा ( Karuna Sharma) यांनी केला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

सचिन वाझे माफीचा साक्षीदार घोषित

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी सचिन वाझेला (Sachin Vaze) माफीचा साक्षीदार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

मान्सून तोंडावर आला तरी देशात साखर कारखाने सुरूच

देशात यंदाचा साखर हंगाम अद्यापही सुरू आहे. (sugar season) मान्सून तोंडावर आला तरी देशातील अनेक साखर कारखाने (Sugar Factory)अजूनही सुरूच आहेत. महाराष्ट्रात अद्यापही 15 लाख टनांच्या आसपास उसाचे गाळप शिल्लक राहिल्याचा अंदाज आहे. दरम्यान देशात 523 पैकी 52 साखर कारखाने सुरू आहेत. यातील 38 साखर कारखाने महाराष्ट्रातील आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

First published:

Tags: Balasaheb thorat, Corona, Sachin waze