सुनिल दवंगे, प्रतिनिधी शिर्डी, 01 जून : ‘जेव्हा जेव्हा हिमालय संकटात आला, तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातील सह्याद्री धावून गेला आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या खोऱ्यात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे दोन दिवसीय नव संकल्प अधिवेशन सुरू झाले आहे. केंद्रीय भाजप सरकार (modi government) संवैधानिक व्यवस्था रोज मोडीत काढणे, देशाला रोज विकणं, देशाची मालमत्ता विकणं या पद्धतीने देश संपवण्यासाठी ते निघाले आहेत’ अशी टीका कॉंग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी मोदी सरकारवर केली आहे. तसंच, महाराष्ट्रात सातत्याने राज्यसभेची निवडणूक परंपरेनं बिनविरोध झाली आहेत. मतदान संख्येच्या स्पष्टतेवर असते. जेवढी चादर तेवढेच पाय पसरावे, असा टोलाही पटोलेंनी भाजपला लगावला. कॉंग्रेस वर्किंग कमेटीमध्ये झालेल्या निर्णयाची अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून शिर्डीत दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा सध्या सुरू आहे. कॉंग्रेसचा देश हिताचा संदेश राज्यातील सर्व सामान्य व्यक्ती पर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा स्तरावर 75 किमीची पदयात्रा होणार आहे. केंद्रातील भाजपच्या सरकारची अत्याचारी, हुकुमशाही व्यवस्था, हिटलरशाही प्रवृत्ती दर्शन महाराष्ट्रातील जनतेला करुन देण्याच काम यापुढील काळात कॉंग्रेस पक्ष करणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. ( BREAKING : दादा पर्व संपलं, सौरभ गांगुलीने दिला BCCI चा राजीनामा ) ‘राज्यसभा ही देशाची निवडणूक आहे, आमचा उमेदवार हा देशातीलच आहे. परदेशाचा नव्हे. आम्हाला भाजपा सारखा देश तोडायचा नाही आम्ही देश जोडायला निघालो आहोत. देश एक आहे. लोकसभा आणि राज्यसभा देशाच नेतृत्व करते. प्रदेशचे नाही. बाहेरचे उमेदवार प्रथमच कॉंग्रेसने दिले असे नाही. हा पायंडा भारतीय जनता पार्टीने पाडला आहे. त्यांनी देखिल बाहेरचे उमेदवार दिले आहेत. आमच्या मित्रपक्षाने बिहारचे उमेदवार आणले होते. जेव्हा गुजरातचा व्यक्ती उत्तरप्रदेश मध्ये जावून लोकसभा लढवू शकतो तेव्हा हे प्रश्न निर्माण होत नाही. मीडियाने कॉंग्रेस पक्षाचा अपप्रचार करण्याचे कॉंट्रॅक्ट घेतले आहे हा प्रश्न निर्माण होत असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली. राज्यसभा निवडणूक म्हणजे जेवढी चादर तेवढचं पाय पसरण महाराष्ट्रात सातत्याने राज्यसभेची निवडणूक परंपरेनं बिनविरोध झाली आहेत. मतदान संख्येच्या स्पष्टतेवर असते. जेवढी चादर तेवढेच पाय पसरावे अशी भूमिका राज्यसभा निवडणुकीत असते. भाजप उद्या माघार घेईन की नाही हे तेच सांगू शकतात. ज्यांच्याकडे जेवढे मतदान आहे त्या तुलनेत उमेदवार अशी पद्धत आहे. महाविकास आघाडी सरकारचे चारही उमेदवार निवडून येतील. मी भाजपा सारखी भविष्यवाणी करत नाही. जी वस्तूस्थिती आहे त्यावर बोलत सांगत आहे, असंही नाना पटोले म्हणाले. मिलींद देवळांच्या ट्विट बाबत काय म्हणाले नाना पटोले? हा पार्टी अंतर्गत विषय असल्याने त्या बाबत येथे चर्चा होवू शकत नाही. कॉंग्रेस मध्ये लोकशाही आहे. त्यांना मत मांडण्याचा अधिकारी आहे. भाजपा सारखी हुकूमशाही कॉंग्रेस पक्षात नाही. तिथे लोकांचा जीव घटमुळत आहे. कॉंग्रस पक्षातील काही अंतर्गत बाबी आहेत. त्यांचे मत समजून घेतले जाईल. प्रभाग रचनेत बाबीत जे काही चुकीचे असेल त्या विरोधात कार्टात जाण्याची भुमिका कॉंग्रेसने आधिच जाहीर केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.