जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / धनंजय मुंडेंनी माझ्या आईची हत्या केली, करुणा शर्मांचा गंभीर आरोप

धनंजय मुंडेंनी माझ्या आईची हत्या केली, करुणा शर्मांचा गंभीर आरोप

 मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल. धनंजय मुंडे यांनी मी सध्याची पत्नी आणि बहिण याच्या व्यतिरिक्त ३ मुलींना फसवलं आहे.

मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल. धनंजय मुंडे यांनी मी सध्याची पत्नी आणि बहिण याच्या व्यतिरिक्त ३ मुलींना फसवलं आहे.

मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल. धनंजय मुंडे यांनी मी सध्याची पत्नी आणि बहिण याच्या व्यतिरिक्त ३ मुलींना फसवलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 जून :  राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्या कथित पत्नी करूणा शर्मा मुंडे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहे. ’ धनंजय मुंडे यांच्या दबावामुळेच माझा आईने आत्महत्या केली.  मुंडे यांची पहिली बायको असून त्याचे माझाकडे पुरावे आहे. त्यांनीच माझ्या आईची हत्या केली आहे, असा गंभीर आरोप करुणा शर्मा ( Karuna Sharma) यांनी केला आहे. करुणा शर्मा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. या पत्रकार परिषदेत मुलगी शिवानी धनंजय मुंडे मोठा गौप्यस्फोट करणार होती. पण ऐनवेळी मुलगी पत्रकार परिषदेस गैरहजर राहिली. ‘धनंजय यांच्या सांगण्यावरून मी बहिणीला घराबाहेर काढले. मी मंत्री महोदय यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र मंत्री महोदय यांनीच माझा बहिणीच्या मोबाइलवर मेसेज केले. यानंतर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्री धनंजय मुंडे याच्या दबावामुळे आमच्यावर गुन्हे दाखल करत अटकेची कारवाई केली.  मी मुंडे यांची पहिली बायको असून त्याचे माझाकडे पुरावे आहे. मी आजपर्यंत माझं तोंड उघडलं नाही. मी आजपर्यंत त्यांची इज्जत करत होती, मुंडे यांच्या दबावामुळेच माझा आईने आत्महत्या केली. २००८ पासून मुंडेंवर विश्वास ठेवून बहिणींशी बोलत नाही. माझा आईची मुंडेंनी हत्या केली, असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला. ( मोठी बातमी! सचिन वाझे माफीचा साक्षीदार घोषित, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार? ) मुंडेंनी मंत्रिपदाचा गैरवापर केला. शरद पवारांनी मुंडेंना मंत्रिपदावरून हकलं पाहिजे. माझापासून दोन मुलांना जन्म देऊन आम्हाला रस्त्यावर सोडलं. मी माझा बहिणीला जेल मध्ये भेटायला गेले. धनंजय मुंडे यांचे अन्य महिलांशीही अनैतिक संबध आहेत याचे पुरावे माझाकडे आहेत, असा आरोपही करुणा शर्मा यांनी केला. छत्रपतीच्या नावाने राजकारण करणारे आज का नाही बोलत. सुप्रिया ताई यांच्याकडे न्यायासाठी अनेकदा विनंती केली  मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. माझी एकच मागणी आहे त्यांच्याकडे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हकलावे. धनंजय मुंडे यांनी इतर महिलांनाही दबाव टाकून गप्प केले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर माझा बहिणीने केलेले आरोप लवकरच माझी बहिण त्याचे पुरावे देईल, असंही करुणा शर्मा म्हणाल्या. ( Tujhech Mi geet Gaat Ahe: अभिनेत्री उर्मिला कोठारेची मालिकेतून एक्झिट ) मी मुंडेंवरील बलात्काराचा गुन्हा लवकरच उचलून धरणार आहे, माझा बहिणीला मुली प्रमाणे सांभाळण्याची ग्वाही देत होते मात्र, मुलीसोबत असे गैरकृत्य केले. मी सीबीआयकडे ही चौकशीची मागणी केली आहे. धनंजय मुंडे 10 नंबरहून का बोलतात एका वेश्याचेही दहा नंबर नसतात मग मुंडे नेमके बोलतात कुणाशी? मी धनंजय मुंडेंविरोधात दिलेल्या तक्रारीबाबत कुठलीच कारवाई होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे याना पाठीशी घालत आहे, असा आरोपही त्यांनी केला. मी पवारसाहेबांची आतापर्यंत इज्जत करत होती मात्र या प्रकरणात अशा लोकांना ते पाठीशी घालत आहे. हे पाहून वाईट वाटत आहे. माझी मुलगी ही परिषद घेणार होती मात्र तिला धमकी येत असल्यामुळे ती आली नाही, असा आरोपही त्यांनी केला. ‘मुंडे मंत्रिपदाचा गैरवापर पुरेपुर करत आहे. जर त्यांनी काही केलं नव्हतं मग धनंजय मुंडे यांनी पैसे दिलेच का ? काय कारण होतं, लाखो रुपये देण्यामागचे. मी ही खंडणी मागते असे धनंजय मुंडे आरोप करतात मी ५ कोटीच्या घरात राहते अडीच कोटीचे माझावर कर्ज आहे, तसंच माझा सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेतले आहे. मी माझा खात्यावरून धनंजय मुंडेंना १ कोटी रुपये दिले आहेत. वेळोवेळी मी  मुंडेंच्या सांगण्यावरून त्याच्या जवळच्या कार्यकर्तांना पैसे दिले आहेत.  मी सध्या सोनं विकून घर चालवत आहे, मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल. धनंजय मुंडे यांनी मी सध्याची पत्नी आणि बहिण याच्या व्यतिरिक्त ३ मुलींना फसवलं आहे. मी ब्लॅकमेलर नाही पण जी पत्नी सध्या त्यांच्यासोबत आहे ती ब्लॅकमेलर आहे. मी जर ब्लॅकमेल करत असती तर मी कर्जबाजारी नसती. या पूर्वी माझे कर्ज धनंजय मुडे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडून भरतात ते आजही भरत आहे, असा दावाही त्यांनी केला. मी पवार यांनाही पत्र लिहून पाठवलेले आहे. मुंडेंना बोलवून समजा मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. परळीतील बबन गिते यांनाही अडकवण्यात मुंडेंचा हात आहे. धनंजय मुंडे केरेक्टर लेस मंत्री आहे. मुंडे यांनी अन्य मुलींचीही अश्लील व्हिडिओ क्लिप बनवल्या आहेत. त्या आधारेच ते त्यांना ब्लॅकमेल करतात. मी आतापर्यंत गप्प होती मात्र आता मी न्यायालयीन लढाई लढणार. माझा मुद्दा विरोधीपक्ष नेतेही उचलून धरत नाही कारण ते एकमेकांना मिळालेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात