मुंबई, 1 जून : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दहावी-बारावीचे निकाल यावर्षी वेळत लागण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल (HSC Result 2022) हा पुढच्या आठवड्यात लागेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल (SSC Result 2022) हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या? “दहावी आणि बारावीचे निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न आहे. पुढच्या आठवड्यात 12 वीचा निकाल लागेल. दहावीचा निकाल हा जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला लागू शकेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागू शकेल. तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दरम्यान, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण (Online Education) देण्यात येत होतं. गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षाही (Board Exam Result) करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला होता. यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं (Offline Board Exams) घेण्यात आल्या आहेत.त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा (Board Result may declare soon in MH) जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र पेपर तपासणी पूर्ण झाली असून मूल्यांकन प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे लवकरच बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत.
‘या’ वेबसाईट्सवर बघता येईल निकाल
1. https://hscresult.11thadmission.org.in 2. https://msbshse.co.in 3. hscresult.mkcl.org 4. mahresult.nic.in असा चेक करा निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. होमपेजवर, बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. तुमची आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा. “निकाल पहा” बटणावर क्लिक करा. महाराष्ट्र राज्य बोर्ड 12वी / बारावीचा निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील वापरासाठी Save करा.