जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आगामी निवडणुकांबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय, शिवसेनेसोबतचा वाद निवळला?

आगामी निवडणुकांबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय, शिवसेनेसोबतचा वाद निवळला?

आगामी निवडणुकांबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय, शिवसेनेसोबतचा वाद निवळला?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक मोठा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 जून : राज्यातील महापालिका निवडणुका (Maharashtra Municipal Elections 2022) जसजशा जवळ येत आहेत तसतशा राजकीय घडामोडींना वेग येताना दिसतोय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या (Maharashtra local body elections) पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Congress) एक मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडी करण्यास तयार आहे. काँग्रेसच्या आज शिर्डीच्या कार्यशाळेत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी (BMC Election 2022) जाहीर करण्यात आलेल्या वॉर्डनिहाय आरक्षणावरुन काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात आज तणाव निर्माण झाल्याचं चित्र होतं. पण हे चित्र फार काळ टिकणार नाही. कारण काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आघाडी करायला तयार आहे. काँग्रेसच्या या निर्णयाला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पाठिंबा दिला तर भाजपपुढील आव्हानं वाढण्याची शक्यता आहे. कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरोधात भाजप (BJP) असं चित्र दिसेल. ( मविआतील वाद पुन्हा चव्हाट्यावर; शिवसेनेकडून काँग्रेसचे खच्चीकरण, वॉर्ड पुर्नरचनेवरुन काँग्रेसचा गंभीर आरोप ) आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. या आरक्षणानुसार, मुंबईतील काही दिग्गज नगरसेवकांना फटका बसत आहे तर काही नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. पण या वॉर्ड पुर्नरचेनवरुन महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर येताना दिसला. कारण, या वॉर्ड पुर्नरचनेवरुन काँग्रेसने नाराजी व्यक्त करत शिवसेनेवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. नगरविकास खात्याच्या निर्देशावरुनच प्रशासनानं मुंबईतील वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षणात फेरफार केले. वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षण सोडतीत शिवसेनेनं स्वत:चा फायदा करुन घेत काँग्रेसच्या जागांवर जाणून बुजून मोठे फेरफार केल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसने संयमाची भूमिका घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी करायला तयार आहे. तसेच मुंबई महापालिका वॉर्ड रचनेविराधात पक्ष म्हणून काँग्रेस कोर्टात जाण्याची शक्यता नाही. नगरसेवक म्हणून कुणी कोर्टात जाऊ शकेल. पण पक्ष म्हणून सेनेविरोधात काँग्रेस कोर्टात जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात