मुंबई, 1 जून : देशात यंदाचा साखर हंगाम अद्यापही सुरू आहे. (sugar season) मान्सून तोंडावर आला तरी देशातील अनेक साखर कारखाने (Sugar Factory)अजूनही सुरूच आहेत. देशात 523 साखर कारखाने आहेत यापैकी सुमारे 450 च्यावर कारखाने बंद झाले असले तरी काही कारखान्यांचा ऊस लाखो हेक्टर शिल्लक आहे. (sugarcane farmer) महाराष्ट्रात अद्यापही 15 लाख टनांच्या आसपास उसाचे गाळप शिल्लक राहिल्याचा अंदाज आहे. दरम्यान देशात 523 पैकी 52 साखर कारखाने सुरू आहेत. यातील 38 साखर कारखाने महाराष्ट्रातील आहेत. (Maharashtra sugar factories)
देशात ५२३ पैकी ५२ कारखाने अजून सुरू आहेत. यापैकी ३८ कारखाने एकट्या महाराष्ट्रात सुरू आहेत. ३० मे अखेरची ही आकडेवारी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या अहवालातून सामोर आली आहे. यामुळे साखर हंगाम पुढचे 15 दिवस चालण्याची भिती ऊस उत्पादकांना आहे. बीड, उस्मानाबाद, जालना, नांदेड, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात राहिला आहे.
हे ही वाचा : Monsoon Update : मान्सून महाराष्ट्राच्या दारात; एंट्रीसाठी कधीचा मुहूर्त साधणार
देशात गेल्या ऑक्टोबरला ५२३ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला. यापैकी मे अखेर ५२ कारखाने सुरू आहेत. हंगाम आटोपण्यात महाराष्ट्र सर्वात पिछाडीवर असून, तब्बल ३८ कारखाने अजूनही उसाचे गाळप करत आहेत. उत्तर प्रदेशात केवळ ३ कारखाने सुरू आहेत. प्रत्येक वर्षी आघाडीवर असणाऱ्या उत्तर प्रदेशाने उसाचा हंगाम संपवला आहे.
महाराष्ट्रात मात्र तब्बल ३८ कारखाने अजूनही ऊस गाळप करत आहेत. जून उजाडला तरीही कारखाने कधी आपला हंगाम संपतील याची निश्चित माहिती प्रशासनाकडे नाही. महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये बहुतांश तीन लाख टनांहून अधिक ऊस शिल्लक आहे तर सर्वात जास्त साखर कारखाने मराठवाड्यात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : केकेच्या मृत्यूबाबात मोठा खुलासा! 2 हजार लोकांची कॅपिसीटी, पोहोचले 5 हजार लोक; गर्दी आवरण्यासाठी सोडला गॅस
यंदा राज्याचा साखर हंगाम अद्यापही सुरू आहे. राज्यातील उस्मानाबाद, मराठवाडा, आणि विदर्भातील काही साखर कारखाने अद्याप सुरू आहे. दरम्यान यंदा साखर हंगामातील गाळप मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त झाल्याने उत्पादन वाढणार आहे. याचबरोबर साखर उद्योगात यंदा होत असलेल्या विक्रमी गाळपामुळे शेतकऱ्यांना एफआरपीपोटी मिळणारी रक्कम 42 हजार कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यभर सध्या केवळ शिल्लक उसाचीच चर्चा होते आहे. शिल्लक ऊस केवळ 15 लाख टनाच्या आसपास आहे. तो पुढील काही दिवसांत पूर्णतः गाळला जाईल. परंतु आतापर्यंत 1312 लाख टनांपेक्षा जास्त उसाचे गाळप यशस्वीपणे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा 42 हजार कोटींची एफआरपी मिळण्याची शक्यता आहे.