जाहिरात
मराठी बातम्या / देश / Assembly Election 2022 Result LIVE: मोदींचा भाजप किती राज्यं राखणार? थोड्याच वेळात ठरणार 5 राज्यांचं भवितव्य

Assembly Election 2022 Result LIVE: मोदींचा भाजप किती राज्यं राखणार? थोड्याच वेळात ठरणार 5 राज्यांचं भवितव्य

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Assembly Election 2022 Result: पाच पैकी चार राज्यांत सध्या भाजपची सत्ता आहे. त्यापैकी किती राज्यांमध्ये सत्तापालट होणार? Exit Polls चे निकाल कितपत खरे ठरणार? लवकरच होईल स्पष्ट

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 10 मार्च: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात समोर येतील. भारतीय जनता पक्षासाठी ही निवडणूक (Assembly Election Results 2022) विशेष प्रतीष्ठेची आहे. पाच पैकी चार राज्यांत सध्या भाजपची सत्ता आहे. त्यापैकी उत्तर प्रदेश सोडता इतर राज्यांमध्ये सत्ता टिकवून ठेवणं भाजपला जड जाऊ शकतं, असं हे निवडणूक निकालाचे अंदाज (Exit Polls 2022) सांगतात.  उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh Vidhansabha Election Results) मोदी-योगी यांचं डबल इंजिन धावणार की अखिलेश यादवांची सायकलच पुढे धावणार, शेतकरी आंदोलनं आणि राजकीय उलथापालथींनंतर (Punjab Vidhansabha Election Results)पंजाबची जनता कोणाला ‘आप’लं मानणार, उत्तराखंडच्या (Uttarakhand vidhansabha results) पहाडी प्रदेशातले लोक पुन्हा भाजपवर विश्वास ठेवणार का, मणिपूरमध्ये  (Manipur Election Results 2022)शिरकाव केलेल्या भाजपला ( BJP ) सत्ता टिकवता येणार का आणि गोव्यात नेमकं काय होणार या प्रश्नांची उत्तरं थोड्याच वेळात उघड होतील. पंतप्रधान मोदींच्या सलग दुसऱ्या दिग्विजयानंतर गेल्या वर्षी काही राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. आता प्रथमच देशातल्या मोठ्या प्रांतांमध्ये निवडणूक होत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे.

    हे वाचा - निवडणूक निकालांनंतर महागाईचा भडका? पेट्रोल-डिझेल दरवाढीसह पाहा काय होतील बदल

    भाजपला गेल्या निवडणुकीत प्रथमच उत्तर प्रदेशात खणखणीत यश मिळालं.  योगी आदित्यनाथ सरकार गेल्या वेळच्या 312 पैकी किती जागा मिळवणार याविषयी उत्सुकता आहे. जवळपास सर्वच Exit Polls मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे, पण किती जागा मिळणार हे मात्र प्रत्यक्ष मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशात 403 जागा, उत्तराखंडच्या 70 जागा, गोवा विधानसभेच्या 40 जागा, पंजाब विधानसभेच्या 117 जादा आणि मणिपूरच्या 60 जागांसाठी मतदारांनी आपला कौल दिला आहे. यापैकी उत्तर प्रदेश विधानसभा आकाराने सर्वांत मोठी. भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष अशी सरळ लढत तिथे होणं अपेक्षित आहे. भाजपने गेल्या वेळसारखंच 300 चा आकडा पार करण्याचा दावा केला आहे, तर अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सपाने त्यांना कट्टर लढत दिली आहे.

    हे वाचा - प्रियंका गांधी पुन्हा होणार का फेल, Exit Poll खरा ठरला तर?

    403 पैकी 325 जागा मिळवून भाजपने मित्र पत्राबरोबर गेल्या निवडणुकीत एक मजबूत सरकार दिलं होतं. एकट्या भाजपनेच 312 जागा खिशात घातल्या होत्या. त्या वेळी उत्तर प्रदेशात मोदींची लाट होती, असं म्हटलं जातं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा भाजपने जाहीर केलेला नव्हता, तेव्हाचं हे घवघवीत यश आता पुन्हा मिळणार का हा प्रश्न आहे. योगी आदित्यनाथ सरकारला ते मागचं यश टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. योगी आदित्यनाथ भाजपला किमान बहुमताचा आकडा गाठून देऊ शकतात का हेच पाहणं महत्त्वाचं आहे. मणिपूरमध्ये काय होणार? मणिपूरमध्ये 2017 मध्ये पहिल्यांदाच भाजपने शिरकाव केला होता. 21 जागा जिंकत सरकारने नागा पीपल्स पार्टी (NPP), नागा पीपल्स फ्रंट (NPF)असा पक्षांशी युती करत सत्ता काबीज केली. त्यापूर्वीची 15 वर्षं मणिपूर राज्यावर काँग्रेसची सत्ता होती.

    हे वाचा

    आता यंदाची निवडणूक सर्वच पक्ष स्वतंत्ररीत्या लढवली आहे. भाजपच्या सरकारातल्या मित्र पक्षांनीही उमेदवार उभे केल्याने एकमेकांविरोधातच लढत आहे. उत्तराखंडात होणार का सत्तापालट? उत्तराखंडच्या 70 जागांसाठी मतदान झालं. उत्तराखंडमध्ये कोणत्याच पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नव्हता, तरी भाजपने नेतृत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी तर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि आपने अजय कोठियाल यांना दिली होती.

    हे वाचा  

    जाहिरात

     2017 साली भाजपने 70 पैकी 57 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 11 आणि इतर पक्षांना 2 जागा जिंकता आल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळूनही भाजपला उत्तराखंडमध्ये मागच्या वर्षी चार महिन्यात तीनवेळा मुख्यमंत्री बदलावे लागले होते. 4 वर्ष त्रिवेंद्रसिंग रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, पण पक्षांतर्गत नाराजीमुळे रावत यांच्याऐवजी तिरथसिंग रावत यांना मुख्यमंत्री केलं. कोरोना व्हायरसमुळे निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकांवर बंदी घातली होती, त्यामुळे तिरथसिंग रावत मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढच्या 6 महिन्यात त्यांना विधानसभेचं सदस्य होणं शक्य नव्हतं, त्यामुळे तिरथसिंग यांना राजीनामा द्यावा लागला. तिरथसिंग रावत यांच्यानंतर पुष्कर सिंग धामी यांना भाजपने उत्तराखंडचं मुख्यमंत्री केलं. 10 मार्च ते 4 जुलै या 4 महिन्यांच्या काळात भाजपला उत्तराखंडमध्ये 3 मुख्यमंत्री बदलावे लागले.

    पंजाबी जनता कुणाला ‘आप’लं मानणार? पंजाबमध्ये प्रथमच सरळ दोन पक्षांची वा आघाड्यांची लढत नाही. या वर्षी राजकीय लढतींना अनेक कंगोरे आहेत. एकीकडे सत्तेत असलेली काँग्रेस आहे तर दुसरीकडे त्यांना विरोध करणारी आम आदमी पार्टी. अकाली-बीएसपी आघाडी आहे तर भाजपने आणि माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी संधान बांधलं आहे. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाची सर्वात अधिक धार होती. अजूनही हे आंदोलन पुरतं शमलेलं नाही. त्यातच निवडणुका आल्यात. शेतकरी संघटनेनेही यंदाच या पक्षांना सरळ टक्कर दिली आहे. त्यामुळे पंजाबमध्ये कोणाचं सरकार येणार, याचा अंदाज बांधणं कठीण झालं होतं. Exit Polls मध्ये आम आदमी पार्टीला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असं असेल तर ‘आप’साठी तो ऐतिहासिक विजय ठरेल. गोव्यात काँग्रेस की भाजप? 2017 साली गोव्यात काँग्रेसने 40 पैकी 17 जागा जिंकल्या आणि तीन जागा जिंकलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीसह अनौपचारिक आघाडीही केली होती; मात्र केवळ 13 जागा जिंकलेल्या भाजपने राजकीय खटपटी करून सरकार स्थापन करण्यात यश प्राप्त केलं होतं. पर्रिकर केंद्रातून पुन्हा राज्यात आले आणि मुख्यमंत्री झाले.

    हे वाचा - Goa Election: निकालाआधीच धास्तावली काँग्रेस, घोडेबाजार टाळण्यासाठी उमेदवारांना करणार हॉटेलात बंद

     अनेक वर्षं गोव्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलेले लोकप्रिय नेते म्हणून मनोहर पर्रीकरांना सर्वांचाच पाठिंवा होता. त्यांच्या पश्चात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यात त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना हव्या असलेल्या मतदारसंघात भाजपने तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. 40 सीट्स असलेल्या गोव्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे; मात्र आप, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमजीपी आदी पक्षांनी या वेळी जोर लावल्यामुळे सर्वांचं लक्ष निकालाकडे आहे. गेल्या वेळी काँग्रेस (Congress) पक्षाने गोव्यात सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या; मात्र तरीही सरकार स्थापन करण्यात भाजपला यश मिळालं होतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात