मराठी बातम्या /बातम्या /देश /

Goa Election: निकालाआधीच धास्तावली काँग्रेस, घोडेबाजार टाळण्यासाठी उमेदवारांना करणार हॉटेलात बंद

Goa Election: निकालाआधीच धास्तावली काँग्रेस, घोडेबाजार टाळण्यासाठी उमेदवारांना करणार हॉटेलात बंद

काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. गोवा काँग्रेसचे उमेदवार उत्तर गोव्यातील हॉटेलमध्ये चेक इन करत आहेत (Goa Congress candidates in Hotel)

  • Published by:  Kiran Pharate

गोवा 08 मार्च : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. गुरुवारी 10 मार्चला निवडणूक निकाल समोर येणार आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa vidhan sabha election 2022) 40 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. झी न्यूज हिंदीने केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपला 13 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला 14 ते 19 जागा मिळतील अशी शक्यता आहे. यामुळे दोन्ही पक्षात काँटे की टक्कर असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. अशात आता काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. गोवा काँग्रेसचे उमेदवार उत्तर गोव्यातील हॉटेलमध्ये चेक इन करत आहेत (Goa Congress candidates in Hotel)

Exit Poll 2022 : या राज्यात होऊ शकते राजकीय खेचाखेच; भाजपला सत्ता राखणं कठीण

घोडे बाजार टाळण्यासाठी उत्तर आणि दक्षिण गोव्यातील उमेदवार आज रात्री या हॉटेलमध्ये जाण्याची शक्यता आहे. पक्षाच्या उच्चपदस्थांकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी काँग्रेसचे अनेक उमेदवार मतमोजणी केंद्रावर येणार नाहीत. त्यांचे प्रतिनिधीत्व त्यांचे निवडणूक प्रतिनिधी करतील. उमेदवारांनी गुरुवारी दुपारपर्यंत हॉटेलमध्येच राहावे अशी सूचना देण्यात आली आहे. CNN News18 ला याबद्दलची माहिती मिळाली आहे.

Uttarakhand Exit Polls : उत्तराखंडमध्ये कांटे की टक्कर, आप ठरणार किंग मेकर!

एक्झिट पोलमध्ये गोव्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपला 13 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला 14 ते 19 जागा मिळतील अशी शक्यता आहे.  तर आम आदमी पक्षाला 1 ते 3 जागांवर समाधान मानावे लागेल. गोव्याची मगोवा पार्टीला 2 ते 5 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिवसेनेनं सुद्धा नशिब आजमावले आहे. पण सेनेला कोणतीही जागा मिळणार नाही, अशी चिन्ह आहेत.

First published:

Tags: Assembly Election, Goa, काँग्रेस