जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'आप'ला लकी ठरलं 2022, दिल्लीनंतर पंजाबही काबीज; उत्तराखंड अन् गोव्याच्या सत्तेची किल्ली हातात!

'आप'ला लकी ठरलं 2022, दिल्लीनंतर पंजाबही काबीज; उत्तराखंड अन् गोव्याच्या सत्तेची किल्ली हातात!

'आप'ला लकी ठरलं 2022, दिल्लीनंतर पंजाबही काबीज; उत्तराखंड अन् गोव्याच्या सत्तेची किल्ली हातात!

‘आप’चा हा राष्ट्रीय विस्तार असल्याचं म्हटलं जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 7 मार्च : पंजाब विधानसभा निवडणुकीत (AAP National Convener Arvind Kejriwal) आम आदमी पक्षाला बहुमत मिळणार असल्याचं Exit Polls वरुन दिसून येत आहे. त्यामुळे यंदा पंजाबमध्ये आमचं सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एग्झिट पोल्सनुसार पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला 70 ते 90 जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपबद्दल चर्चा केली जात आहे. तर दुसरीकडे उत्तराखंड आणि गोव्यातही आपला काही जागा मिळाल्या आहेत. या जागा कमी असल्या तरी सरकार स्थापन करण्यात त्यांचाही सहभाग होऊ शकतो असं दिसून येत आहे. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand Exit Poll) पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलेल असा अंदाज जन की बात एक्झिट पोलने (Jan ki Baat Exit Poll) दिला आहे. या सर्व्हेनुसार उत्तराखंडमध्ये भाजपला (BJP) 32-41 जागा, काँग्रेसला (Congress) 27-35 जागा तर इतर पक्षांना 0-4 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, पण उत्तराखंडमधून आम आदमी पक्षाला (AAP) मोठा धक्का बसला आहे. उत्तराखंडमध्ये आपला 0-1 जागा मिळेल, अशी शक्यता जन की बातच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. आपला गोव्यात आणि उत्तराखंडमध्ये फार जागा मिळवता आल्या नसल्या तरी सरकार स्थापन करण्यासाठी आपचा महत्त्वाचा भाग असू शकतो. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (goa vidhan sabha election 2022)  मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता दोन दिवसांत विधानसभेची मतमोजणी होणार आहे. पण, आज आलेल्या एक्झिट पोलमध्ये (exit poll) भाजपचे मिशन 22 + सपशेल फेल ठरत असल्याचे चित्र आहे. पण, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपला 18 ते 22 जागा मिळतील, असा दावा केला आहे. पंजाबमध्ये किती झालं मतदान? पंजाबमध्ये 20 फेब्रुवारी रोजी सर्व 117 विधानसभा जागांवर मतदान झालं. आता तरी सर्वांचं लक्ष 10 मार्च रोजी येणाऱ्या निकालांवर आहे. पंजाबमध्ये गेल्या वेळेस 77 टक्के मतदान झालं होतं. मात्र यंदा 72 टक्के मतदान झालं आहे. सर्वाधिक जास्त मतदान यंदा मालवा भागात झालं आहे. मालवा हा आम आदमी पक्षाचा गड मानला जात आहे. तलवंडी साबो विधानसभेत सर्वाधिक 83.67 टक्के मतदान झालं, तर अमृतसर पश्चिम जागांवर सर्वात कमी 50.10 टक्के मतदान झालं. मनसामध्ये  73.45%, मलेरकोटलामध्ये 72.84%, पतियाळात 62.10%, पूर्व अमृतसरमध्ये 59.77%, जलालाबादमध्ये 80.10%, लांबीत 72%, धुरीमध्ये 78.89%, भदौडमध्ये 70% मतदान झालं. एक्झिट पोल्सविषयी अधिक माहिती शेअरचॅटच्या या लिंक वर क्लिक करून मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात