मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /आगामी विधानसभेत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र? शरद पवारांचे सूचक विधान

आगामी विधानसभेत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र? शरद पवारांचे सूचक विधान

या बैठकीत राज्यातील विविध घडामोडी, राज्यपाल नियुक्तं 11 आमदारांचा प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

या बैठकीत राज्यातील विविध घडामोडी, राज्यपाल नियुक्तं 11 आमदारांचा प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

'शिवसेना हा विश्वास ठेवणारा पक्ष आहे, त्यांच्यामुळे काँग्रेस सुद्धासोबत आली आणि महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला स्विकारलं, देशानं स्विकारलं'

मुंबई, 10 जून : महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) आता पडणार, तेव्हा पडणार असं अनेक मुहुर्त भाजपचे (BJP) नेते देत असतात. पण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल आणि आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी करेल, असं म्हणत एकच धुरळा उडवून दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 22 वा वर्धापन दिन ( 22nd anniversary of the Nationalist Congress Party) आहे. या निमित्ताने बोलत असताना शरद पवार यांनी आगामी काळात राज्यातील निवडणुकीचे चित्रच बदलून टाकले आहे.

औरंगाबादला पावसाने झोडपले, वीज कोसळून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, 1 गंभीर जखमी

'तीन वेगवेगळ्या विचारांची पक्ष एकत्र आली, आम्ही कधी शिवसेनेसोबत काम केलं नव्हतं. पण, शिवसेना हा विश्वास ठेवणारा पक्ष आहे, त्यांच्यामुळे काँग्रेस सुद्धासोबत आली आणि महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला स्विकारलं, देशानं स्विकारलं. महाविकास आघाडी सरकार हे भक्कम असून पाच वर्ष टिकेल आणि आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी करेल, असं शरद पवार यांनी म्हटलं.

शिवसेना विश्वास ठेवणारा पक्ष

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर एकांतात मोदींनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली, असं माझ्या वाचण्यात आलं. त्यानंतर अनेक जण तर्कवितर्क लढवत आहे. पण, शिवसेनेसोबत आपण काम कधी केलं नाही. महाराष्ट्र शिवसेनेला खूप वर्षांपासून पाहत आहे. माझा पूर्वीचा अनुभवानुसार, हा विश्वासाचा पक्ष आहे' असं शरद पवार म्हणाले.

.इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता तो बाळासाहेबांनी पाळला.

यावेळी शरद पवार यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत किस्सा सांगितला ' जेव्हा जनता पक्षाचे सरकार आले होते. तेव्हा काँग्रेसचा पराभव झाला होता. अशा परिस्थितीत काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना हा पक्ष पुढे आला होता. तो नुसता पुढे आला नाहीतर धोरणात्मक निर्णय घेत इंदिरा गांधी यांना मदत करण्यासाठी एक सुद्धा उमेदवार उभा केला नव्हता. विधानसभा निवडणुकीत एखादा पक्ष उमेदवारच उभा करणार नाही, यापेक्षा मोठा निर्णय काय असू शकतो. त्याची चिंता बाळासाहेबांनी कधी केला नाही. इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता तो बाळासाहेबांनी पाळला. हा इतिहास काही विसरता येणार नाही. त्यामुळे कुणी काहीही शंका घेत असतील तर शिवसेनेनं त्या कालखंडात भूमिका घेतली होती ते पाहता, काही जण काहीही आखाडे बांधत असतील तर ते वेगळ्या वळणाचे आहे, हे सरकार पाच वर्ष टिकेल', असं पवारांनी ठणकावून सांगितलं.

तुमच्याकडे आहे हे 2 रुपयाचं नाणं तर घरबसल्या कमवा 5 लाख रुपये, वाचा काय आहे ऑफर

'तुमच्या मागे जो सामान्य माणूस आहे. त्याच्याशी बांधिलकी जपा. आपले अनेक सहकारी सोडून गेले, पण तरीही राष्ट्रवादीने आपली सत्ता स्थापन केली आणि राज्यात नेतृत्व करण्याची फळी निर्माण केली. राजकारण सांभाळण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. सत्ताही महत्त्वाची आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताही महत्त्वाची आहे, असंही पवार म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, NCP, Sharad pawar