नवी दिल्ली, 10 जून: तुम्ही जर चांगली कमाई (Earning Money) करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी फायद्याची संधी ठरू शकते. सध्या जुन्या नोटा, नाणी यांच्या ऑनलाइन विक्रीचं प्रमाण वाढलं आहे. यांवर बोली लावून तुम्ही एका रात्रीत लखपती (how to become a millionaire) बनू शकता. तुमच्याकडे जर जुन्या नाण्याचं कलेक्शन (Old coins collection) असेल तर तुमच्यासाठी ते विशेष फायद्याचे ठरेल. आज आम्ही तुम्हाला अशा नाण्याबद्दल सांगणार आहोत, ज्याची विक्री करून तुम्ही एक मोठी रक्कम मिळवू शकता. वाचा काय आहे प्रक्रिया
वाचा या नाण्याबद्दल
2 रुपयाचं हे नाणं 1994 मध्ये बनलं आहे. या नाण्याच्या मागच्या बाजुला भारताचा झेंडा आहे. क्विकर (Quickr) वेबसाइटवर या दुर्मीळ नाण्याची किंमत पाच लाख रुपये लावण्यात आली आहे. तर स्वातंत्र्याआधीच्या राणी व्हिक्टोरियाच्या नाण्याची किंमत 2 लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे जॉर्ज वी किंग एम्परर 1918 च्या एका रुपयाच्या ब्रिटिश नाण्याची किंमत 9 लाख रुपयांपर्यंत लावण्यात आली आहे.
हे वाचा-पित्याचं कर्ज फेडण्यासाठी तो होता नोकरीच्या शोधात, उभारली 70 हजार कोटींची कंपनीविक्रेता आणि खरेदीकर्त्यावर किंमत निर्भर
ही नाणी ई-कॉमर्स वेबसाइट क्विकरवर विकली जात आहेत. दरम्यान हे विक्रेता आणि खरेदीकर्त्यावर निर्भर आहे की ते कोणत्या किंमतीवर खरेदी-विक्री करण्यास तयार होतात. मात्र हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की या नाण्यांची मागणी वाढती आहे, ज्यामुळे लाखो रुपये सहज कमावता येतील.
हे वाचा-स्वस्तात घरखरेदीची सुवर्णसंधी! 11 जूनला ही सरकारी बँक करत आहे लिलाव,वाचा सविस्तरकशी कराल या नाण्यांची विक्री?
जर तुमच्याकडे अशी नाणी आहेत आणि तुम्हाला त्यांची विक्री करायची आहे तुम्हाला आधी साइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. नाण्याचा फोटो क्लिक करा आणि तो तुम्हाला साइटवर पोस्ट करावा लागेल. खरेदीदार थेट तुम्हाला संपर्क करतील. त्याठिकाणी पेमेंट आणि डिलिव्हरीच्या अटींनुसार तुम्ही तुमच्याकडे असणारं नाणं विकू शकता.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.